Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

संविधानातील ३७१ कलमाचा आम्ही सन्मान करतो , त्याला हात लावणार नाही : अमित शहा

Spread the love

आसाममध्ये नुकतीच एनआरसीची पहिली यादी जाहीर करण्यात आली. पहिली यादी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी आसामचा दौरा केला. नॉर्थ ईस्ट काऊन्सिलच्या बैठकीसाठी शाह उपस्थित होते. ईशान्येकडील राज्यांना विशेष दर्जा देणाऱ्या ३७१ व्या कलमाला संविधानात विशेष स्थान आहे आणि भाजपा सराकर त्याचा सन्मान करते, या कलमाला आम्ही हात लावणार नाही असे शाह यावेळी म्हणाले.

भारतीय संविधानात ईशान्येकडील राज्यांना देण्यात आलेल्या विशेषाधिकाऱ्यांच्या ३७१ व्या कलमाला विशेष स्थान देण्यात आले असून भाजपा त्याचा आदर करते. भाजपा सरकार यामध्ये कोणताही बदल करणार नाही. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देण्यात आलेले कलम ३७० मधील तरतुदी या तात्पुरत्या स्वरूपाच्या होत्या. कलम ३७० आणि कलम ३७१ या दोन्हींमध्ये मोठा फरक असल्याचे शाह यांनी नमूद केले. जम्मू काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम ३७० हटवल्यानंतर कलम ३७१ बाबतही अनेक चर्चा रंगू लागल्या होत्या. या कलमांतर्गत भारतीयांना त्या ठिकाणी संपत्ती खरेदी करता येत नाही, असंही ते म्हणाले.

महाभारतातील बब्रूवाहन असो किंवा घटोत्कच हे दोन्ही ईशान्य भारतातील होते. तर, मणिपूरमध्ये अर्जुनचा विवाह झाला होता. श्रीकृष्णाच्या नातवाचा विवाह ईशान्य भारतात झाला असल्याची आठवण अमित शहा यांनी करून दिली.

राज्यघटनेतील कलम ३७१ ईशान्य भारतातील सहा राज्यांसह ११ राज्यांत लागू आहे. कलम ‘३७१ अ’ नुसार कोणत्याही व्यक्तीला नागालँडमध्ये जमीन खरेदी करता येत नाही. फक्त राज्यातील आदिवासी व्यक्ती जमीन खरेदी करू शकतात.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!