Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

केंद्राचा मोठा निर्णय : दहा सरकारी बँकांचे विलीनीकरण

Spread the love

अर्थव्यवस्थेला आलेली मरगळ दूर करण्यासाठी केंद्र सरकारने आणखी एक मोठे पाऊल उचलले आहे. सार्वजनिक क्षेत्रातील १० बँकांचे विलीनीकरण करून त्यातून चार नव्या बँकांची निर्मिती करण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज केली. केंद्राच्या या महत्त्वपूर्ण निर्णयानंतर सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या आता २७ वरून १२ वर येणार आहे.

पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया या चारही बँकांच्या विलीनीकरणातून अस्तित्वात येणारी बँक देशातील दुसरी सर्वात मोठी बँक ठरणार आहे. कॅनरा बँक आणि सींडिकेट बँक यांचं विलीनीकरण होईल. त्यातून अस्तित्वात येणारी बँक देशातील चौथी सर्वात मोठी बँक असेल.

असे होणार विलीनीकरण:

विलीनीकरण- १ : पंजाब नॅशनल बँक, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडिया.

विलीनीकरण २ : कॅनरा बँक, सींडिकेट बँक

विलीनीकरण ३: युनियन बँक, आंध्रा बँक आणि कार्पोरेशन बँक (पाचवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल.

विलीनीकरण ४ : इंडियन बँक, अलाहाबाद बँक (सातवी सर्वात मोठी बँक अस्तित्वात येईल)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!