Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

वीस वर्षांपूर्वी हरवलेला हरवलेला इसम पुंडलिकनगर पोलिसांनी केला कुटुंबियांच्या हवाली, विशेष पोलीस अधिकाऱ्यांची विशेष कामगिरी !!

Spread the love

औरंगाबाद – अशोक डोंगरे . १९९९ साली नुकतेच लग्न झाल्यावर २१व्या वर्षी औरंगाबादेहून ठाण्याला येत बेपत्ता झालेल्या अशोक डोंगरे  यांना  मुंबईच्या सेवाभावी संस्थेने २० वर्षानंतर पुंडलिकनगर पोलिसांच्या मदतीने त्याच्या कुटुंबियांच्या हवाली केले खरे  पण सदर बेपत्ता इसमाचा सुरवातीला पत्नी आणि मुलांनी या इसमाचा स्वीकार करण्यास नकार दिला. परंतु  शहरातील विशेष पोलिस अधिकार्‍याने या इसमाचा सांभाळ करायची तयारी दर्शवल्यावर कुटुंबाच्या हृदयाला पान्हा फुटला आणि अशोक डोंगरे यांचा स्वीकार करण्याची तयारी दर्शविली.

या प्रकरणाची सविस्तर माहिती अशी कि , अशोक मारुती डोंगरे  (४४) रा. गजानन मंदीर परीसर कडा कार्यालयाशेजारी हे १९९९ साली नुकतंच लग्न झाल्यानंतर मुंबईला औरंगाबादेहून रेल्वेने जात होते ठाण्याजवळ रेल्वे आली असतांना रेल्वेच्या डब्यातील लौखंडी राॅड डोक्याला लागून डोंगरे गंभीर जखमी झाले होते. पण त्यानंतर मुंबईच्या पसार्‍यात ते फुटपाथवर फेकल्या गेले इकडे घरी आठवडा झाला तरी पतीचा फोन नाही म्हणून डोंगरै यांच्या पत्नीने मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नवरा हरवल्याची तक्रार दिली.

दरम्यान मुंबईतील साकीनाका येथील करुणा सेवाभावी संस्था फुटपाथवरील नागरिकांना जमा करुन त्यांच्यावर शारिरीक, मानसिक, उपचार करुन त्यांना कुटुंबियाच्या हवाली करते.कुटुंब सापडलेच नाही तर स्वावलंबी बनवते. याच नियमाला धरुन करुणा संस्थेचे मानसोपचार तज्ज्ञ डाॅ.प्रशांत शहा यांनी डोंगरे यांच आव्हान स्वीकारलं  त्यांना पुर्णपणे बरं केलं.ते बर झाल्यावर त्यांनी तीन वर्ष करुणा संस्थेसमोरील चहाच्या दुकानावर साडेतीन हजार रु, महिन्यावर वेटर ची नौकरी केली. डोंगरेंचा स्मृतीभंश आजार पूर्ण बरा झाल्यावर डोंगरेंना आपलं औरंगाबादचं घर संसार आठवला.

करुणा सेवा संस्थेतीलअधिकार्‍यांनी चार दिवसांपूर्वी डोंगरेंनी सांगितलेला पत्ता पडताळून पाहिला. तो पुंडलिकनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निघाला तेथील एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील मिसींग रजिस्टर शोधले अशोक डोंगरेंचा कुठेही उल्लेख मिळंत नव्हता.शेवटी शहरातील विशेष पोलिस अधिकार्‍यांच्या व्हाॅटसअॅप ग्रुपवर माहिती व्हायरल झाल्यावर विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांनी डोंगरेंचा पत्ता शोधून काढला. डोंगरेंच्या कुटुंबियांनी अशोक डोंगरे  हे कुटुंबातील सदस्य आहेत अशी कबुली दिल्यावर करुणा सेवा संस्थेच्या अधिकार्‍यांनी एपीआय घन्नशाम सोनवणे आणि पथकाच्या मदतीने डोंगरेंच्या कुटुंबियांना समक्ष बोलावले.

प्रत्यक्ष अशोक डोंगरेंना त्यांच्या पत्नीने २० वर्षानंतर पाहिल्यावर त्यांचा स्वीकार  करण्याचे धाडंस होत नव्हते मुलेही महाविद्यालयात शिक्षण घेत असल्यामुळै त्यांचा वडलांना जिवंत पाहून विश्वास बसत नव्हता. वडिलांनी आपल्याला वार्‍यावर सोडलं एवढंच त्यांना जाणवंत होत. डोंगरे यांच्या पत्नीने पती बेपत्ता झाल्यापासून शिवणकाम करुन मुलांना मोठं केल. त्यांचे शिक्षण केले. हे सरलेले दिवस डोंगरेच्या कुटुंबियांना स्वीकार कारयला तयार नव्हते. म्हणून विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे यांनी अशोक डोंगरे यांना सांभाळायची तयारी दाखवल्यावर डोंगरेंच्या कुटुंबियांनी डोंगरेंचा स्वीकार करण्याची तयारी दाखवली.शेवटी आज शुक्रवारी एपीआय घन्नशाम सोनवणे यांनी अशोक डोंगरेंच्या कुटुंबियांची समजूत काढली. व डोंगरेंना त्यांच घर मिळवून दिले.परिसरातील सर्वच नागरिकांनी हा सोहळा पाणावलेल्या डोळ्यांनी पाहिला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!