Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मुंबई सामूहिक बलात्कार प्रकरण : पीडितेच्या मृतदेहाचे शवविच्छेदन इन कॅमेरा करण्यास प्रशासन तयार , नातेवाईक आरोपींच्या अटकेवर ठाम

Spread the love

औरंंंगाबाद : दोन महिन्यापुर्वी मुंबईत झालेल्या सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडित मुलीचा बुधवारी (दि.२८) रात्री उपचारादरम्यान घाटी रूग्णालयात मृत्यू झाला.  या घटनेला दिड  महिना उलटून गेल्यावरही पोलिसांनी तपस कार्याला वेग आणला नाही आणि संशयित आरोपींची नवे देऊनही त्यांना अटक केली नाही त्यातच मुलीचे निधन झाल्याने पीडितेच्या नाताईवाईक संतप्त झाले असून अत्याचार पीडित तरूणीच्या नातेवाईकांनी आरोपींना अटक करावी , चौकशीसाठी एसआयटी स्थापन करावी , तपासात हलगर्जीपणा करणाऱ्या पोलिसांवर आणि डॉक्टरांवर कारवाई करावी त्याशिवाय  मृतदेह ताब्यात घेतला जाणार नाही असा पावित्रा घेतल्याने शुक्रवारी (दि.३०) देखील सायंकाळी उशिरापर्यंत पोस्टमार्टम झाले नसल्याची माहिती बेगमपुरा पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक मुकुंद  देशमुख यांनी दिली. सदर शव विच्छेदन इन कॅमेरा करण्याची घाटी रुग्णालय प्रशासनाने तयारी दर्शविली आहे .

या विषयी औरंगाबाद, मुंबई येथे राष्टवादी काँग्रेसच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. या प्रकरणी चुनाभट्टी पोलीस ठाण्यावर काढलेल्या मोर्चाचे नेतृत्व खा . सुप्रिया सुळे , नवाब मलिक यांनी केले आहे तर औरंगाबादेत छाया जंगले , विजय साळवे यांच्या नेतृत्वात शहागंज मधील गांधी  चौकात आंदोलन करण्यात आले. आरोपींना फाशी देण्यात यावी अशी  करण्यात आली आहे.

मुळची जालना जिल्ह्यातील  १९ वर्षीय तरूणी मुंबईतील चेंबुर भागात राहणा-या आपल्या भावाकडे राहण्यासाठी दोन महिन्यापुर्वी गेली होती. ७ जुलै रोजी आपल्या मैत्रिणीचा वाढदिवस असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली होती. दरम्यान तिला शितपेयातुन गुंगी येणारे द्रव्य  देवून तिच्यावर चार ते पाच जणांनी सामुहिक बलात्कार केला होता. या घटनेमुळे बेबी शारिरीक आणि मानसीकदृष्ट्या खचून गेली होती. सामुहिक अत्याचारामुळे तिची प्रकृती खालावल्याने पीडितेला  उपचारासाठी नातेवाईकांनी घाटीत दाखल केले होते. मात्र तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही.

दरम्यान, याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून तो चेंबुर येथील चुनाभट्टी पोलिसांकडे पुढील तपासासाठी वर्ग करण्यात आला होता. उपचारादरम्यान बेबीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर चुनाभट्टी पोलिस ठाण्याच्या उपनिरीक्षक शिर्के या आपल्या पथकासह औरंगाबादेत दाखल झाल्या. परंतु पीडितेच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम होवू शकले नाही.

वरिष्ठ अधिका-यांनी केला समजूत काढण्याचा प्रयत्न

पीडितेच्या नातेवाईकानीं  पोस्टमार्टम करण्यास आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिल्यामुळे घाटी रूग्णालयात पेच निर्माण झाला आहे. पोलिस उपायुक्त निकेश खाटमोडे, सहाय्यक पोलिस आयुक्त डॉ.नागनाथ कोडे, घाटीच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, पोलिस निरीक्षक मुकुंद  देशमुख, मधुकर सावंत आदींनी पीडित तरूणीच्या नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. परंतु नातेवाईकांनी आरोपींना अटक केल्याशिवाय पोस्टमार्टम केल्यास आत्मदहन करू असा इशारा दिला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिका-यांनी घेतली पोलिस आयुक्तांची भेट
मुंबईत झालेल्या सामुहिक अत्याचार पीडित तरूणीचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष विजयकुमार साळवे, शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख, महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा मेहराज पटेल, शहर कार्याध्यक्षा प्रतिभा वैद्य, यशस्वी वाघमारे, वंदना वाघमारे, शोभा गायकवाड, मंजूषा पवार आदींच्या शिष्टमंडळाने पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांची भेट घेतली. अत्याचार पीडित तरूणीचे इनवॅâमेरा पोस्टमार्टम करून आरोपींना अटक करण्याची मागणी शिष्टमंडळाने पोलिस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

माजी राज्यमंत्री फौजिया खान , मेहबूब खान यांनीही पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेऊन न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!