Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : इंडियन कॅडेट फोर्स तर्फे पूरग्रस्तांसाठी औरंगाबादकरांना मदतीसाठी आवाहन

Spread the love

आपल्या महाराष्ट्रातील कोल्हापूर – सांगली – सातारा येथे आलेल्या महापुराने हजारो लोकांचा केवळ संसार उध्वस्त नाही केला तर अनेकांना आपला जीव गमवावा लागला. आज रोजी आपले लोक आसमानी संकटात सापडलेली आहेत तेथील लोकांना जास्तीत जास्त मदतीची गरज आहे.त्यामुळे औरंगाबादकरांनी दिलेली मदत आपण इंडियन कॅडेट फ़ोर्स च्या माध्यमातून पूरग्रस्तांनपर्यंत तात्काळ पोहोचूया.

इंडियन कँडेट फोर्स तर्फे 20 जणांचे पथक आपल्या औरंगाबाद मधुन 13 ऑगस्ट रोजी सकाळी रवाना होणार आहे. तरी आपल्याला आव्हान करण्यात येते की, आपण खालील प्रमाणे मदत करू शकता.
त्यामध्ये तांदूळ, डाळी, साखर, तेल, चटणी, गव्हाचे पीठ, चना, हळद, मीठ, लसणाची पेस्ट, मिरची पेस्ट, बटाटे, पत्रावळी, द्रोण, ग्लास, साखर, चहा, पत्ती, दूध पावडर, माचिस, मेणबत्ती, ब्लांकेट्स, शाल, बेडशीट, मच्छर कॉइल,इन्स्टंट फूड पॅकेट, नवीन कपडे, मेडिसिन अशा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू आपण पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देऊ शकतो.

आपल्याला समाजाचं काही देणं लागतो या भावनेतून आपण मदत करू शकता.
इंडियन कँडेट फॉर्स ची टिम त्या ठिकाणी जाऊन 8 दिवस तेथे राहून पुरी भाजी चे पॅकेट व खिचडी बनवून पूरग्रस्तांन पर्यंत पोचणार आहोत.
तरी आपण सर्वांनी पुढाकार घेऊन मदत करावी असे इंडियन कँडेट फोर्स च्या वतीने कमांडर विनोद नरवडे यांनी आव्हान केले आहे.
आपणाला जी काही मदत द्यायची त्यासाठी खालील व्यक्तींना संपर्क करू शकता:-
श्री.विनोद नरवडे – 9422214851
श्री.नंदूजी पटेल – 9823018757
श्री.जगदीश खैरनार- 9403474747
श्री.बाळासाहेब राठोड- 9823391024
श्री.राहुल अहिरे – 9420314126
श्री.अनिल भवर – 9422214620
श्री. अशोक अंधारे – 9923559555
श्री. आनंद आंचलकर – 9822811777
यांना आपण संपर्क करू शकता.

आपल्याला जी काही मदत वस्तू स्वरूपात करायची आहे ती ICF कार्यालयावर आणून जमा करावी.
स्थळ :-
इंडियन कॅडेट फोर्स कार्यालय, हिंदी राष्ट्रभाषा भवन बिल्डिंग, पैठण गेट, टिळक पथ, औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!