Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Gujrat : सुरत, वडोदरातही पावसाचा धडाका ; पूरसदृश परिस्थिती , विमान, रेल्वे सेवेवर मोठा परिणाम

Spread the love

महाराष्ट्रातील मुंबई , नाशिक बरोबरच गुजरातमधील सुरतवडोदराला मुसळधार पावसाचा फटका बसला आहेदक्षिण गुजरातमध्ये शनिवारी पुरस्थिती निर्माण झाली आहेसुरतमध्ये सर्वत्र पाणी साचल्याने शाळामहाविद्यालये बंद ठेवण्यात आली असून याचा विमानसेवेवर देखील परिणाम झाला आहे. पावसामुळे तापी आणि विश्वमित्रा नद्यांना पुर आला असून दक्षिण गुजरातमधील जनजीवन विस्कळीत झाले आहेआतापर्यंत सात जण वाहून गेले आहेततसेच पावसाची संततधार कायम राहिल्याने वडोदरातील हवाई वाहतूक बंद करण्यात आली असून ही वाहतूक अहमदाबादला वळवण्यात आली आहेदरम्यानरेल्वेरुळ पाण्याखाली गेल्याने रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहेआतापर्यंत तब्बल ११ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या असून शहरातील बससेवेवर त्याचा परिणाम झाला आहे.

वडोदरातील विश्वमित्र कॉलनीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेल्वे दलाच्या जवानांनी मदत केली आहेरेल्वे दलाच्या जवानांनी नागरिकांना बिस्कीटपाण्याच्या बाटल्यादुधाची पाकिटे पुरवली आहेसुरतमध्येही अशीच परिस्थीती असून एअर इंडिया आणि स्पाईस जेटची विमाने अहमदाबादला वळवण्यात आली आहेअहमदाबादमध्ये माणिक चौक परिसरात घर कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला आहेतर आगीत सापडलेल्या दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!