Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Chandryan- 2 : चांद्रयान २ चा प्रवास योग्य दिशेने , चौथ्यांदा बदलली कक्षा , गाठला आणखी एक टप्पा : इस्रो

Spread the love

भारतीय अवकाश संशोधन संस्था इस्रोच्या शास्त्रज्ञांनी शुक्रवारी संध्याकाळी चांद्रयान-२ ची कक्षा यशस्वीरित्या बदलली. कक्षा बदलाचा हा चौथा टप्पा होता. चांद्रयान 2 ची पृथ्वीपासूनची कक्षा टप्याटप्याने वाढवण्यात येत आहे. शुक्रवारी दुपारी ३ वाजून २७ मिनिटांनी चांद्रयान-2 च्या कक्षेत यशस्वीरित्या बदल करण्यात आला. चांद्रयान-2 पृथ्वीपासून किमान (पेरिजी) २७७ किमी आणि कमाल (एपोजी) ८९ हजार ४७२ किमी अंतरावर स्थिरावण्यात आले. आता ६ ऑगस्ट रोजी चांद्रयानाची कक्षा पुन्हा बदलण्यात येणार आहे.

चांद्रयान २ चा प्रवास योग्य दिशेने सुरु आहे असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. प्रत्येकवेळी कक्षा बदल करताना चांद्रयान २ ला ऊर्जा मिळणार आहे. कक्षा वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे चांद्रयान २ मध्ये पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने जाण्यासाठी पुरेशी ऊर्जा निर्माण होणार आहे. आता पुढचा कक्षा बदल सहा ऑगस्टला करण्यात येणार आहे. १४ ऑगस्टला चांद्रयान २ चा पृथ्वीची कक्षा सोडून चंद्राच्या दिशेने प्रवास सुरु होईल. २० ऑगस्टला चांद्रयान २ चंद्राच्या कक्षेत प्रवेश करेल असे इस्रोकडून सांगण्यात आले आहे. तीन सप्टेंबरला विक्रम लँडर आणि प्रग्यान रोव्हर मुख्य यानापासून वेगळे होतील. त्यानंतर सात सप्टेंबरला लँडर चंद्रावर उतरेल. भारताच्या या महत्वकांक्षी चांद्रयान २ मोहिमेकडे जगाचे लक्ष लागले आहे. चंद्रावर पाण्यासह अन्य अनेक नवीन गोष्टी शोधून काढण्याचा चांद्रयान 2 चा प्रयत्न असेल.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!