Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : जनावरे चोरी करणारे दोघे गजाआड, ग्रामीण गुन्हे शाखेची कारवाई

Spread the love

औरंंंगाबाद : ग्रामीण भागातून जनावरे चोरी करणा-या दोन जणांचा पर्दाफाश ग्रामीण गुन्हे शाखा पोलिसांनी केला. जनावरे चोरी करणा-या दोघांच्या ताब्यातून पोलिसांनी एक टेम्पो, दुचाकी, मोबाईल व जनावरे विक्री करून मिळालेली रोख रक्कम असा एकूण  ७ लाख ३३ हजार रूपये किमतीचा  मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे  यांनी सोमवारी (दि.२९) दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नजीर कुरैशी बशीर कुरैशी (वय २७, रा.इंदिरानगर, गारखेडा परिसर), शेख आरेफ शेख रशिद (वय २२, रा.निलजगांव, ता.पैठण, ह.मु.देवळाई परिसर) अशी जनावरे चोरी करणा-यांची नावे आहेत. नजीर कुरैशी व शेख आरेफ यांनी गेल्या दोन ते तीन महिन्याच्या काळात मौजे झाल्टा, गांधेली, बाळापूर, चिंचोली, खोडेगांव, घारदोन, बेंबळ्याची वाडी, गाडीवाट, निलजगांव, बिडकीन व इतर ११ ठिकाणाहुन जनावरांची चोरी केली होती.
ग्रामीण पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, अपर अधीक्षक गणेश गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत पुंâदे, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, जमादार विक्रम देशमुख, नवनाथ कोल्हे, गणेश मुळे, विठ्ठल राख, नदीम शेख, बाबासाहेब नवले, गणेश गांगवे, योगेश तरमळे, जिवन घोलप, संजय तांदळे, सय्यद झिया, चिकलठाणा पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक महेश आंधळे, सहाय्यक फौजदार कटकुरी, जमादार थोटे, पुंगळे, सुरासे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

खडकेश्वर परिसरातील जुगार अड्यावर गुन्हे शाखेचा छापा, ५ लाख २७ हजाराचा मुद्देमाल जप्त

औरंंंगाबाद पोलिस आयुक्तलयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या खडकेश्वर परिसरातील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी छापा मारला. पोलिसांनी पत्यावर पैसे लावून झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळणाNया ७ जुगा-यांना गजाआड केले. पोलिसांनी जुगा-यांच्या ताब्यातून दोन दुचाकी, ७ मोबाईल, जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, रोख रक्कम असा एवूâण ५ लाख २७ हजार ५१० रूपये विंâमतीचा मुद्देमाल जप्त केला असल्याची माहिती गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे यांनी सोमवारी (दि.२९) दिली.
खडकेश्वर परिसरातील हॉटेल मृणाल पॅलेसमध्ये जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हेशाखा पोलिसांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक तुषार देवरे, जमादार नितीन मोरे, भगवान शिलोटे, विलास वाघ, संजय खोसरे, विशाल पाटील यांच्या पथकाने रविवारी रात्री ९ वाजेच्या सुमारास हॉटेलवर छापा मारला. त्यावेळी ७ जुगारी पत्यावर पैसे लावून जुगार खेळतांना मिळून आले. याप्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात जुगाNयाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!