Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

९० दिवसात पाठवायचा अहवाल पाठवायला लागले ९०० दिवस, टीपी सहसंचालक कावळेंची चौकशी करणार : मुख्य सचिव नितीन करीर

Spread the love

औरंगाबाद – औरंगाबाद टाऊन प्लॅनिंग चे सहसंचालक एन.आर.कावळे यांना समज द्यावी लागेल असा खुलासा नगर विकास विभागाचे मुख्य सचिव नितीन करीर यांनी केला.
आमच्या प्रतिनिधीने शहरातील टी.डी.आर. घोटाळ्या संदर्भात अहवाल सादर करण्यात तीन महिन्या ऐवजी तीन वर्ष का लागले असा प्रश्न विचारला होता. त्यावर कावळे यांनी उत्तर दिले की, मी मुख्यमंत्री असो की आणखी कोणी मंत्री असो प्रत्यक्ष भेटून बोलतो. फोनवर कधीच बोलंत नसतो. हा प्रकार नगरविकासाचे मुख्यसचिव करीर यांना समजल्यानंतर त्यांनी संतप्त होत वरील प्रतिक्रिया दिली. सहसंचालक कावळे यांनीप्रसारमाध्यमांशी बोलतांना भान ठेवायला हवे. घडलेला प्रकार आपण मुख्यमंत्री महोदयांच्या कानावरही घालणार असल्याचे करीर म्हणाले.

टी.डी.आर. घोटाळ्याचा अहवाल २०१६ साली पाठवणे आवश्यक असतांना नगर रचना विभागाचै सहसंचालक एन.आर . कावळेंनी तो जुलै २०१९ मध्ये शासनाला गुपचूप पाठवला. याबाबतही करीर चौकशी करणार असल्याचे म्हणाले.

शहरातील टी.डी.आर. घोटाळा उघडकीस आल्यानंतर महापालाकेचे तत्कालीनआयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी तीन ते चार वरिष्ठ अधिकार्‍यांना तडकाफडकी निलंबित केले होते.महापालिकेत बोगस टी.डी.आर. प्रमाणपत्र वाटप करणारी एक गॅंग कार्यरत होती.२००८ ते२०१६ पर्यंत २१४ प्रकरणामधे टी.डी.आर. मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ६८ प्रकरणात मूळ जमीन मालकांना सोडून भलत्याच नागरिकांना टी.डी.आर. प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली आहेत. महापालिकेतील काही वरिष्ठ अधिकार्‍यांना हाताशी धरुन टी.डी.आर. माफिया वाटेल त्या पध्दतीने टी.डी.आर. प्रमाणपत्रे वाटंत होती. महापालिकेकडे वहिवाटी साठी असलेली जागा नव्याने ताब्यात घेण्याचै प्रकार घडले. प्रकरणात सर्वोच्च न्यायालयात याचिकाही दाखल आहे. तसेच या प्रकरणाची तक्रार काॅंग्रेस सरचिटणीस राजेंद्र दाते पाटील यांनी महापालिका आयुक्तांकडे केली होती.या सर्व प्रकरणाचा अहवाल सहसंचालक कावळे यांनी गुपचूप ९० दिवसांअभावी ९०० दिवसांनी का पाठवला याबाबत नगरविकास विभागाकडून चौकशी केली जाणार असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी शेवटी सांगितले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!