Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

१७ तासांचा संघर्ष !! “महालक्षमी ” मधून प्रवास करत होत्या ९ गर्भवती महिला , १ हजार ५० प्रवाशांची सुखरूपपणे सुटका

Spread the love

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मानले सर्वांचे आभार

वांगणीजवळ पुराच्या पाण्यात तब्बल १७ तास अडकलेल्या महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये एक ९ महिन्यांची गर्भवती महिलाही अडकली होती. गाडीतच या महिलेला प्रसववेदना सुरू झाल्या आणि तिच्या नातेवाईकांची एकच गाळण उडाली. मोठ्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर या महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात यश आले आहे. रेश्मा कांबळे असे या महिलेचे नाव आहे. रेश्मा या मुंबईहून महालक्ष्मी एक्स्प्रेसने कोल्हापूरला निघाल्या होत्या. प्रसूतीसाठी तेथील रुग्णालयात त्यांनी नाव नोंदवले होते. दरम्यान, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल, नौदल आणि एनडीआरएफने यशस्वी मोहीम राबवत गाडीतील सर्व १ हजार ५० प्रवाशांची सुखरूपपणे सुटका केली आहे. मात्र रेल्वेने हा एकदा ७०० इतका दिला आहे. जवळपास ३ ते ५ फूट पाण्यात ही एक्स्प्रेस अडकली होती.

दरम्यान, शुक्रवारी रात्री महालक्ष्मी एक्स्प्रेस वांगणीजवळ पुराच्या पाण्यात अडकली आणि त्यात रेश्मा याही अडकल्या. रेश्मा या डी-१ बोगीमध्ये होत्या. तिथेच रात्री त्यांना प्रसववेदना सुरू झाल्या. त्यानंतर त्यांच्या नातेवाईकांनी मदतीसाठी अनेकांशी संपर्क साधला. बराचवेळ गेल्यानंतर रेश्मा यांच्यापर्यंत मदत पोहोचली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना त्यांना सुखरूपपणे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रेश्मा यांच्याप्रमाणेच या एक्स्प्रेसमधून आणखीही ८ गर्भवती महिला प्रवास करत होत्या. त्यांनाही मदतीसाठी बराचवेळ धडपड करावी लागली व मोठा मनस्ताप सहन करावा लागला, अशी माहिती असल्याचे वृत्त मटाने दिले आहे. मात्र त्यास  अधिकृत दुजोरा मात्र मिळालेली नाही.

महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या बचाव कार्यात मदत केलेल्या सर्व बचाव पथकांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विटर वरून सर्वांचे आभार मानले.

‘महालक्ष्मी एक्सप्रेसमध्ये अडकलेले सर्व प्रवासी सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे, हे सांगताना मला आनंद होत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी आपल्या ट्विटमध्ये नमूद केले आहे. ”एनडीआरएफ, भारतीय लष्कर, नौदल, हवाईदल, रेल्वे, पोलिस, स्थानिक प्रशासन या सर्वांनी एकत्र येऊन, समन्वयाने अतिशय कौशल्याने हे अभियान राबविले आणि सर्व प्रवाशांची सुखरूप सुटका केली. या अभियानात सहभागी सर्वांचा मी अतिशय आभारी आहे आणि त्यांचे अभिनंदनही करतो,” असेही यावेळी म्हणाले.

या सर्व प्रवाशांना कल्याण ते कोल्हापूर या विशेष रेल्वेची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. महालक्ष्मी एक्स्प्रेसमध्ये अडकलेल्या सर्व प्रवाशांची एनडीआरएफच्या चार तुकड्या, वायुदल आणि नौदल यांच्या मदतीने या सुखरुप सुटका करण्यात आली. सकाळपासूनच बचाव कार्य सुरु होते. सगळ्या प्रवाशांना सुखरुप बाहेर काढण्याचे आव्हान होतं जे लिलया पेलत एनडीआरएफ, वायुदल आणि नौदल आणि स्थानिकांनी मिळून प्रवाशांची सुटका केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!