Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

‘कोणाचाही कल्पनाविलास काहीही असो, मुख्यमंत्री भाजपचाच होणार’ : सरोज पांडे

Spread the love

राज्याचा पुढील मुख्यमंत्री कोण होणार यावरून शिवसेना भाजपत वादाची ठिणगी पडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. शिवसेनेने पुढील मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असे जाहीर करून काही दिवसच उलटले असताना, ‘कोणाचाही कल्पनाविलास काहीही असो, मुख्यमंत्री भाजपचाच होणार’ असा पुनरुच्चार भाजपच्या महाराष्ट्र प्रभारी सरोज पांडे यांनी केला आहे. देशात भाजप हा अत्यंत मजबूत पक्ष असून लोक भाजपत यायला इच्छुक असल्याचेही त्या म्हणाल्या.

नाशिक जिल्हा आढावा बैठकीपूर्वी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले. भाजपचा होणार असे वक्तव्य केले होते. पांडे यांच्या या वक्तव्याबाबत प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे घेतील असे दानवे यांनी स्पष्ट केले होते. मात्र, राज्याच्या प्रभारी असलेल्या पांडे यांनी पुन्हा एकदा तेच वक्तव्य करत भाजपची भूमिका स्पष्ट केली आहे.

राज्यात शिवसेनेशी आमची युती आहेच, मात्र देशात मोदी आणि राज्यात देवेंद्र यांच्यावर लोकांचा विश्वास आहे. देशात भाजप मजबूत पक्ष आहे, असे सांगताना त्यांनी आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. लोकशाही शासन व्यवस्थेत विरोधी पक्ष मजबूत असावा लागतो. मात्र, देशात आणि राज्यात विरोधी पक्ष निष्प्रक्ष असल्याची टीका पांडे यांनी केली.

कर्नाटकातील परिस्थितीवरून काँग्रेसला भाजपवर टीका करण्याचा कोणताही नैतिक अधिकार नसल्याचेही त्या म्हणाल्या. काँग्रेसला आपले लोक सांभाळण्यात अपयश आल्याचे त्या म्हणाल्या. भाजप कधीही ‘डर्टी पॉलिटिक्स’ करत नाही

आपलं सरकार

Click to listen highlighted text!