Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai : स्वाईन फ्ल्यू मुळे महिलेचा मृत्यू

Spread the love

केईएम रुग्णालयात शनिवारी स्वाइन फ्लूमुळे तरुणीचा मृत्यू झाला. गोवंडी येथे राहणाऱ्या २६ वर्षीय दानिश्ता खान हिला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला लेप्टोचीही लागण झाली होती. तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. १३ जुलै रोजी रात्री तिचा मृत्यू झाल्याची माहिती केईएम रुग्णालय प्रशासनाने दिली आहे.

गोवंडी येथे राहणाऱ्या दानिश्ता खान हिचा केईएम रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तिला ८ जुलै रोजी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, तिला लेप्टोचीही लागण झाली होती. तिच्यावर एमआयसीयू विभागात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच १३ जुलै रोजी शनिवारी रात्री तिचा मृत्यू झाला. याखेरीज, मुंबईत जानेवारी महिन्यापासून २३७ रुग्णांची नोंद करण्यात आली, तर चार बळी गेले आहेत. जानेवारी ते जुलै या काळात राज्यात तपासण्यात आलेल्या एकूण रुग्णांची संख्या १४ लाख २४ हजार ३५० इतकी आहे. तर ऑसेलटॅमिवीर दिलेले संशयित फ्लू रुग्ण २२ हजार ३७६ एवढे आहेत. राज्यातील बाधित रुग्णांची संख्या १ हजार ७४५ असून, सध्या रुग्णालयात भरती असलेले रुग्ण ८६ आहेत. यात उपचार करून घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या १,४७० इतकी आहे. तसेच राज्यात जानेवारीपासून १९१ जणांचा, तर मुंबईत चार जणांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे, असल्याचं पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!