Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : जाणून घ्या काँग्रेसकडून आमदारकी लढविणास इच्छुक असणारांची नावे

Spread the love

जिल्ह्यातील नऊही मतदारसंघांसाठी काँग्रेसने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले होते. असे अर्ज भरण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी दुपारी पत्रपरिषद घेऊन जिल्हा काँग्रेसचे प्रभारी अध्यक्ष अनिल पटेल व शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांनी जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत.

सिल्लोड मतदारसंघ- प्रभाकर पालोदकर, श्रीराम महाजन, सुनील काकडे, विजय दौड, कैसर आझाद, राजेश मानकर, भास्कर घायवट.
कन्नड- संतोष कोल्हे, नामदेव पवार, नितीन पाटील, अशोक मगर, अनिल सोनवणे, बाबासाहेब मोहिते.
फुुलंब्री- डॉ. कल्याण काळे, अनिल मानकापे, तारा उकिर्डे.
पैठण- अनिल पटेल, विनोद तांबे, बाळासाहेब भोसले, शेख तय्यब शेख बाबा.
गंगापूर- किरण पाटील डोणगावकर, सय्यद कलीम.
वैजापूर- पंकज ठोंबरे, प्रशांत सदाफळ.

यानंतर नामदेव पवार यांनी औरंगाबाद शहराच्या तीन मतदारसंघांतील इच्छुकांची नावे जाहीर केली. ती अशी :
औरंगाबाद पूर्व- इब्राहिम पटेल, इब्राहिम पठाण, जीएसए अन्सारी, मोहसीन अहमद, अशोक जगताप, सरताज पठाण, अहमद हुसेन.
औरंगाबाद पश्चिम- डॉ. जितेंद्र देहाडे, चंद्रभान पारखे, महेंद्र रमंडवाल, पंकजा माने, जयप्रकाश नारनवरे, राघोजी जाधव, जयदीप झाल्टे, सतीश शिरसाट, रमेश शिंदे, प्रदीप शिंदे, साहेबराव बनकर.
औरंगाबाद मध्य- मोहंमद हिशाम उस्मानी, सागर मुगदिया, मशरूर खान, मो. अय्युब खान, युसूफ खान.
या तिन्ही मतदारसंघांत आणखी काही अर्ज येणार असल्याची शक्यता पवार यांनी वर्तवली.

यावेळी अनिल पटेल यांनी सिल्लोड तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी श्रीराम महाजन यांची नियुक्ती जाहीर केली. लोकसभा निवडणुकीत पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून समीर सत्तार यांच्याजागी आता जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून पंकज ठोंबरे यांची नियुक्ती करण्यात आली असल्याचेही पटेल यांनी सांगितले. अनिल पटेल यांनी सांगितले, २००९ च्या निवडणुकीतील जिल्ह्यातला ३/६ असा फार्म्युला राहील. पण पैठण यावेळी काँग्रेससाठी सुटायला पाहिजे, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. सिल्लोड तालुका काँग्रेस कार्यकारिणी बदलण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले. पत्रपरिषदेस विलास औताडे, मुजफ्फर खान, डॉ. पवन डोंगरे, मीर हिदायत अली, अरुण शिरसाट, मीर हिदायत अली, संतोष भिंगारे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी काँग्रेसचा भर सोशल इंजिनिअरिंगवर राहील. आमच्या मतदारसंघवार बैठका झाल्या आहेत. पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या बाबतीत चार दिवसांनंतर व्यापक बैठक आयोजित करून डॉक्टर, वकील व बुद्धिवंतांची मते जाणून घेतली जाणार आहेत. काँग्रेसची मानसिकता वंचित बहुजन आघाडीबरोबर आघाडी करण्याची आहे. वंचित बहुजन आघाडीच्याही कार्यकर्त्यांची दिसते, पण याबाबतीत श्रेष्ठीच निर्णय घेतील, असे नामदेव पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीबरोबरची आघाडी एमआयएम सोडून झाली पाहिजे, असे मत पवार यांनी मांडले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!