Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

कंटेनर चालकाचा गाडीवरील दाबा सुटल्याने विक्रोळीत फुटपाथवर झोपलेल्या चौघांना उडवले; तीन ठार , एक जखमी

Spread the love

विक्रोळीत भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहेकंटेनरने फुटपाथवर झोपलेल्या ४ जणांना उडवल्याची दुर्दैवी घटना शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घडलीया घटनेमध्ये २ जणांचा जागेवरच  मृत्यू झाला असून २ जण गंभीर जखमी झाले होते . जखमींमध्ये एका महिलेचा आणि एका लहान मुलाचा समावेश होता . विक्रोळीतील पार्क साईट परिसरात शनिवारी रात्री विचित्र अपघातात टँकर खाली झोपलेल्या दोन महिलांचा मृत्यू झाला. तर या अपघातात गंभीर जखमी झालेल्या मुलाचे रुग्णालयात निधन झाले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील नव्वद फुट रोडवर एक टॅंकर उभे होते. त्या टॅंकरच्या आडोशाने काही नागरिक झोपले होते. रात्रीच्या सुमारास भरधाव वेगाने आलेल्या एका टॅंकरने या टॅंकरना धडक दिली. त्या टॅंकरचे ब्रेक फेल झाल्याची माहिती मिळते आहे. या धडकेत फुटपाथवर झोपलेले लक्ष्मी वाघमारे (५०), सायम्मा वाघमारे (१५) आणि कार्तिक वाघमारे (३) चिरडले गेले. लक्ष्मी आणि सायम्मा जागीच ठार झाल्या तर कार्तिकचा राजवाडी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. कंटेनर चालकाचा गाडीवरचा ताबा सुटून हा अपघात घडल्याची माहिती समोर आली आहे. सध्या कंटेनरचा चालक फरार असून पोलीस चालकाचा शोध घेत आहेत. दरम्यान, या अपघाताचा निषेध करत परिसरातील स्थानिक रस्त्यावर उतरले आहेत.

विक्रोळी येथे शनिवारी रात्री या विचित्र कंटेनर अपघातात तिघांचा नाहक बळी गेला आहेतर दोन जण जखमींपैकी मुलाचे निधन झाले आहेकंटेनर चालकाचा गाडीवरील दाबा सुटल्याने यामध्ये हे सर्व जण कंटेनरखाली आले असून दोन जण चिरडले गेले. यामध्ये आधी कंटेनरने एका दुसऱ्या कंटेनरला धडक दिली. त्या अपघातामध्ये रस्त्याच्या कडेला झोपलेले ४ जण चिरडले गेल्याची माहिती एका प्रत्यक्षदर्शीने दिली.

विक्रोळी पश्चिम येथील पवई रोड नंबर १७ येथे रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या टँकर खाली दोन महिला आणि एक लहान मुलगा असे तीन जण झोपले होते. या महिला मजुरीचे काम करतात. रात्री सव्वा नऊच्या सुमारास त्या टँकर च्या मागे आणखी एक टँकर पार्क केला जात होता. टँकर पार्क करत असताना चालकाचे टँकर वरील नियंत्रण सुटले आणि त्याने समोरील टँकर धडक दिली. उतार असल्याने पार्क केलेले टँकर पुढे जाऊ लागले आणि यात त्या टँकर खाली झोपलेले तिघे जण चिरडले गेले. तिघांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात पोहोचण्यापूर्वी दोन्ही महिलांचा मृत्यू झाला तर लहान  गंभीर जखमी झालेल्या मुलावर उपचार चालवू असताना निधन झाले .अपघातानंतर टँकर चालक फरार झाल्याचे समजते. या प्रकरणी पार्क साईट पोलीस अधिक तपास करत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!