Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Malegaon Bomb Blast : गैरहजर असलेल्या साध्वी प्रज्ञाला कोर्टाची वॉर्निंग , उद्या हजर राहा अन्यथा परिणामांना सामोरे जा

Spread the love

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी कोर्टात उपस्थित राहण्याचे आदेश असूनही आरोपी भाजप खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर कोर्टात गैरहजर राहिल्या. यामुळ एनआयए कोर्टाने उद्या हजर राहा अन्यथा परिणामांना सामोरे जा अशी ताकीदच साध्वी प्रज्ञा यांना दिली आहे. २००८मध्ये नाशिकजवळील मालेगाव येथे मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणी साध्वी प्रज्ञा प्रमुख आरोपी आहेत. तब्येतीच्या कारणांमुळे साध्वी प्रज्ञा यांची जामिनावर सुटका करण्यात आली होती. २०१७मध्ये आरोप निश्चिती झाल्यानंतर नियमितपणे एनआयए कोर्टात खटला सुरू आहे. खासदार झाल्यानंतर कोर्टात गैरहजर राहण्याची मुभा देण्यात यावी अशी मागणी एनआयए कोर्टात साध्वी प्रज्ञा यांनी केली होती. ही मागणी फेटाळत दर आठवड्याला सुनावणीला उपस्थित राहण्याचे निर्देश साध्वी प्रज्ञांना देण्यात आले होते.

त्यानुसार साध्वी प्रज्ञांनी आज कोर्टात उपस्थित राहणे अपेक्षित होते. पण उच्च रक्तदाबाचा त्रास झाल्यामुळे काल रात्री रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून आज त्या कोर्टात उपस्थित राहू शकणार नाहीत अशी माहिती त्यांच्या वकिलांनी दिली आहे. तेव्हा आजच्या गैरहजेरीबद्दल मुभा देत असून उद्या मात्र त्यांनी हजर राहावे अन्यथा परिणामांना सामोरे जावे असा इशारा कोर्टाने दिला आहे. आता साध्वी प्रज्ञा उद्या कोर्टात उपस्थित राहतात की नाही हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!