Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Mumbai FSI घोटाळा : लोकायुक्तांनी गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर ठपका ठेवल्याचा आरोप

Spread the love

मुंबईच्या ताडदेव मधील एम.पी. मिल कंपाऊंड येथील एस आर. ए. प्रकल्पात विकासकाच्या फायद्यासाठी नियम डावलून विकासकाला एफ.एस.आय. अन्यत्र वापरास मंजुरी दिल्याचा आरोप गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहतांवर आहे. याप्रकरणी लोकायुक्त एम. एल. तहलियानी यांच्यामार्फत करण्यात आलेल्या या चौकशीत मेहता यांनी मंत्री म्हणून आपली जबाबदारी निष्पक्ष पार पाडली नसल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे. मेहता यांनी मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्टीकरण देत विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

दरम्यान एमपी मिल कंपाउंड प्रकरणात गृहनिर्माण मंत्री प्रकाश मेहता यांच्या भूमिकेवर लोकायुक्तांनी ताशेरे ओढल्याचे वृत्त प्रकशित झाल्यानंतर आता विरोधकांकडून देखील जोरदार टीका होत आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी तर आता यावरून थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधत प्रकाश मेहतांना क्लिन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांचे पितळ उघडे पडल्याची जोरदार टीका केली. तसेच यावेळी त्यांनी एम. पी. मिल कंपाऊंड प्रकरणी प्रकाश महेता यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी पुन्हा एकदा केली.

येत्या १७ जूनपासून पावसाळी अधिवेशन सुरू होत असून जर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला नाही तर कामकाज चालू देणार नाही, असा इशारा धनंजय मुंडे यांनी यावेळी दिला. तसेच हे केवळ हिमनगाचे एक टोक आहे, भ्रष्टचाराचे थैमान घालणाऱ्या १६ मंत्र्यांच्या गैरकारभारातील सत्य हळूहळू बाहेर येणार असल्याचे सांगत, ‘सत्य परेशान हो सकता है पराजित नही’, अशी काव्यात्मक टीका देखील मुंडेंनी यावेळी केली.

लोकायुक्तांच्या अहवालात एम.पी. मिल कंपाऊंड प्रकरणात मेहतांचा कारभार पारदर्शी नसल्याचे ताशेरे ओढले असल्याचे वृत्त आहे. मात्र अहवाल आला वा नाही याबाबतच मेहतांनी साशंकता व्यक्त केला आहे. केवळ विरोधासाठी विरोध न करता आधी स्वत:च्या सूत्रांची माहिती पक्की करावी असे मेहता यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.  दरम्यान, हा अहवाल लोकायुक्तांनी कधी आणि कोणाला दिला याची माहिती द्यावी, अशी मागणी काँग्रेसने लोकायुक्तांकडे केली आहे.

प्रकाश मेहता यांच्या राजीनाम्याची धनंजय मुद्दे यांची मागणी

मेहता यांचा हा घोटाळा आम्ही विधान परिषदेत बाहेर काढला होता, त्यावेळेस अनेक दिवस आम्ही सभागृह चालू दिले नाही, त्यांच्या राजीनाम्याची तसेच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशीची मागणी केली होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी लोकायुक्तांकडून चौकशी करू असे सांगितले होते. मुख्यमंत्री नेहमीच क्लीन चीट देण्याचे काम करतात, लोकायुक्तांनी ठेवलेला ठपका पाहता आपण केलेले आरोप योग्यच होते, त्यामुळे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जनाची नाही तर मनाची ठेवुन मेहतांचा राजीनामा घ्यावा किंवा त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.

प्रकाश मेहता यांचा खुलासा 

‘अहवालात ठपका ठेवलायं, असं कुणी सांगितलंय, ठपका ठेवलाय असा अहवाल कुठे आहे. तुम्हाला ही जी बातमी मिळाली ती बातमीच मला मिळालेली आहे. त्यामुळे असा काही अहवाल आलाय लोकायुक्तांचा अहवाल आलाय या संबंधी माझ्याकडे कुठलीही माहिती नाही. शासनाकडे आलाय आणि शासनाने मला कळवलंय असही काही नाही.’

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!