Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MHT-CET निकाल जाहीर; मुंबईची किमया, अमरावतीचा सिद्धेश टॉपर

Spread the love

राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, कृषी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या एमएचटी-सीईटी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. मध्यरात्रीपासून निकाल संकेतस्थळावर उपलब्ध आहे. मुंबईची किमया शिकारखाने आणि अमरावतीचा सिद्धेश अग्रवाल ९९.९८ टक्के गुणांसह टॉपर ठरले आहेत. राज्याच्या प्रवेश परीक्षा कक्षातर्फे घेतलेल्या एमएचटी सीईटी परीक्षेसाठी राज्यातून चार लाख १३ हजार २८४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील तीन लाख ९२ हजार ३५४ विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष परीक्षा दिली. तर २०, ९३० विद्यार्थी अनुपस्थित राहिले. पीसीएम (फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स) विभागातून २ लाख ७६ हजार १६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर पीसीबी (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) या विभागातून २ लाख ८१ हजार १५४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.

ऑनलाइन पद्धतीने जाहीर झालेल्या निकालावर विद्यार्थ्याचे नाव, त्याच्या पालकाचे नाव, आईचे नाव यांचा उल्लेख असेल. निकालावर संबंधित विद्यार्थ्याचे छायाचित्रही असणार आहे. त्याचप्रमाणे संबंधित विद्यार्थ्याने किती वाजता निकाल डाउनलोड करून घेतला, याबाबतची माहितीही दिली जाईल, असे प्रवेश परीक्षा कक्षातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना https://mhtcet2019.mahaonline.gov.in/ या संकेतस्थळाला भेट देऊन निकाल पाहता येईल

आपलं सरकार

Click to listen highlighted text!