Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

धक्कादायक : बजरंग दलाकडून शाळकरी विद्यार्थ्यांना पिस्तूलं आणि बंदुका वापरण्याचे धडे , भाजप आमदाराच्या शाळेचा पराक्रम

Spread the love

भाजप आमदाराच्या शाळेत बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी शाळकरी विद्यार्थ्यांना शस्त्रास्त्र चालविण्याचे प्रशिक्षण दिले असल्याचे धक्कादायक वृत्त आले आहे . मिरा रोड येथील एका शाळेमध्ये बजरंग दलाचे कार्यकर्त्यांनी  शाळेतील विद्यार्थ्यांना पिस्तूलं आणि बंदुका वापरण्याचं प्रशिक्षण दिल्याची हि बातमी आहे . ही शाळा भाजप आमदाराच्या मालकीची असून डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया या संघटनेने याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी ठाणे पोलीस अधिक तपस करीत आहेत .

एका इंग्रजी वर्तमानपत्राने दिलेल्या वृत्तानुसार ‘सेव्हन इलेव्हन अकॅडमी’ या शाळेच्या प्रांगणात २५ मे ते १ जून दरम्यान विद्यार्थ्यांसाठी बंदुक प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरात सहभागी झालेले अनेक विद्यार्थी अल्पवयीन होते. या प्रशिक्षणाचे फोटो प्रकाश गुप्ता नामक व्यक्तीने फेसबुकवर पोस्ट केले होते. हे फोटो व्हायरल होताच डेमॉक्रेटिक युथ फेडरेशन ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी नवघर पोलीस ठाण्यात याविरोधात तक्रार दाखल केली. सेव्हन इलेव्हन अकॅडेमी ही शाळा भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या मालकीची आहे. बजरंग दल या कट्टर हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते शस्त्र प्रशिक्षण देत असल्याचा आरोप तक्रारकर्त्यांनी केला आहे.

दरम्यान या शिबीरासाठी आवश्यक सर्व परवानग्या घेण्यात आल्या आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. नरेंद्र मेहतांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देणं टाळलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!