Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

दणका : सिलिंडर झाले महाग, अनुदानित आणि विनाअनुदानित दोन्हीचे दर वाढले !!

Spread the love

लोकसभा निवडणूक संपताच आधी पेट्रोल डिझेल च्या भावात वाढ झाली आणि आता , जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी स्वयंपकाच्या गॅस सिलिंडरची किंमत वाढली आहे. विनाअनुदानित एलपीजी सिलिंडर २५ रूपयांनी महागलं आहे तर अनुदानित सिलिंडरच्या किंमतीत १ रूपया २३ पैशांची वाढ झाली आहे. दिल्लीत १ जून म्हणजेच आजपासून अनुदानित सिलिंडरचा दर ४९७ रुपये ३७ पैसे इतका झाला आहे. तर मुंबईतल्या अनुदानित सिलिंडरची किंमत ४९५ रुपये ९ पैसे इतकी झाली आहे. HPCL, BPCL या कंपन्यांनी ही माहिती दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चं तेल महाग झाल्याने आणि डॉलरच्या तुलनेत रूपया कमकुवत झाल्याने सिलिंडरच्या किंमती वाढल्या आहेत.

मुंबईत विनाअनुदानित सिलिंडरची किंमत ७०९ रुपये ५० पैसे इतकी झाली आहे. IOC च्या वेबसाईटच्या महिनुसार दिल्लीत अनुदानित सिलिंडरची किंमत ४९७ तर मुंबईत ४९५ रुपये ९ पैसे तर कोलकात्यामध्ये हा दर ५०० रुपये ५२ पैसे इतका झाला आहे. तर चेन्नईत ४८५ रुपये २५ पैसे इतकी आहे.

१ एप्रिलला गॅस सिलिंडरच्या किंमती वाढवल्या होत्या. अनुदानित सिलिंडर मिळत असलेल्या कुटुंबाला वर्षाला १२ सिलिंडर मिळतात आणि सबसिडीचे पैसे बँक खात्यात जातात. आज झालेल्या दरवाढीमुळे सामान्यांचं बजेट कोलमडणार आहे यात शंका नाही. कारण नेहमीप्रमाणे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे वाढलेले भाव आणि रुपयाची किंमत कमी झाल्याने सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाल्याचे सांगितले जात आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!