Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पंडित नेहरूंनीच या देशात लोकशाहीचा पाय भक्कम केला : राहुल गांधी

Spread the love

‘भारतासोबत स्वतंत्र झालेल्या व लोकशाही व्यवस्था स्वीकारलेल्या जगातील अनेक देशांत लोकशाही काही वर्षांतच लयाला गेली. तिथं हुकूमशाहीचा उदय झाला. मात्र, भारतात ७० वर्षांनंतरही लोकशाही टिकून आहे. याचं श्रेय पंडित नेहरूंना जातं,’ अशा शब्दांत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज  पंतप्रधान पंडित नेहरू यांना आदरांजली वाहिली.

माजी देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त राहुल यांनी एक ट्विट केलं आहे. ‘पंडितजींनी भारतात आधुनिक, भक्कम व स्वायत्त संस्थांची पायाभरणी केली. या संस्थांनी देशातील लोकशाही मजबूत करण्यास मदत केली. आजच्या दिवशी पंडित नेहरूंच्या या योगदानाचं स्मरण करूया,’ असं राहुल यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. तत्पूर्वी, आज सकाळी यूपीएच्या नेत्या सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी दिल्लीतील शांतीवन येथील स्मृतीस्थळी जाऊन नेहरूंना आदरांजली वाहिली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!