Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

नोकरी शोधता शोधता चंद्राणी झाली सर्वात तरुण वयाची खासदार !!

Spread the love

निवडणुकीच्या काही महिने आधी चंद्राणी नोकरी शोधत शोधणाऱ्या , चंद्राणी मुर्मू या तरुणीला ओरिसारामध्ये  बीजेडीनं तिकीट दिलं आणि त्यांना लॉटरीच लागली. चंद्राणी या प्रचंड मतांनी निवडून आल्या, शिवाय देशातील सर्वात तरुण खासदार होण्याचा मानही त्यांना चंद्राणी यांना मिळाला आहे . त्यांनी वयाची २५ वर्ष ११ महिने पूर्ण केली आहेत. चंद्राणी या इंजिनीयरिंगमध्ये पदवीधार आहेत . ओडिशाची क्योंझर लोकसभा सीट अनुसूचित जमातीसाठी राखीव होती. या मतदारसंघात त्यांनी भाजपच्या अनंत नायक यांचा ६७ हजाराहून अधिक मतांनी पराभव केलाय. नायक हे या मतदारसंघातून दोनदा विजयी झाले होते. यापूर्वी इंडियन नॅशनल लोकदलाचे दुष्यंत चौटाला यांनी १६ व्या लोकसभेच्या निवडणुकीत सर्वात कमी वयाचे खासदार होण्याचा मान पटकावला होता.

सांगण्यात येत आहे कि , काही महिन्यांपूर्वी सर्व सामान्य बेरोजगारी मुलींप्रमाणेच चंद्राणी या सुद्धा नोकरीच्या शोधात होत्या. स्पर्धा परीक्षांमध्येही त्यांनी नशीब अजमावून पाहिलं होतं. नोकरीचा शोध सुरू असतानाच त्यांना लोकसभा निवडणूक लढवण्याची ऑफर आली आणि खासदार म्हणूनही त्या निवडून आल्या. निवडून आल्यानंतर चंद्राणी यांनी तरुणांना रोजगार मिळवून देण्यावर आपला भर राहणार असल्याचं सांगितलं.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!