दोन वाहनांच्या अपघातात पोलिसांना मिळाल्या 7 कोटींच्या नोटा …
हैद्राबाद : निवडणुकीच्या काळात नोटा सापडणे तसे नवीन नाही. मात्र या नोटा नेमक्या असतात कुणाच्या याचा उलगडा मात्र पुन्हा होत नाही. आंध्र प्रदेशात शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात कार्डबोर्ड बॉक्समध्ये 7 कोटी रुपये लपवून घेऊन जात असताना नल्लाजरला मंडळातील अनंतपल्ली येथे एका ट्रकला धडकल्यानंतर टाटा एस वाहन उलटले आणि या प्रकरणाचा पर्दाफाश झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , विजयवाडाहून विशाखापट्टणमच्या दिशेने हे वाहन जात असताना ही घटना घडली. या गाडीमध्ये 7 पुठ्ठ्याचे बॉक्स जात असल्याचे स्थानिकांच्या लक्षात आले आणि त्यांनी पोलिसांना माहिती दिली. जप्त केलेली रक्कम सुमारे 7 कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. या अपघातात चालक जखमी झाला असून त्याला उपचारासाठी गोपालपुरम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास आक्रीत आहेत.
#WATCH | Andhra Pradesh: Rs 7 Crores cash, kept in seven boxes, seized in East Godavari district.
A vehicle had overturned after being hit by a lorry at Anantapally in Nallajarla Mandal. Locals noticed that 7 cardboard boxes, containing cash, were being transferred in that… pic.twitter.com/KbQmb5M175
— ANI (@ANI) May 11, 2024
याआधीही गेल्या आठवड्यात आंध्र प्रदेशातील एनटीआर जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केली होती. याठिकाणी तपासणी करताना पोलिसांनी पाईपने भरलेल्या ट्रकमधून सुमारे 8 कोटी रुपयांची रोकड जप्त केली. दरम्यान, या प्रकरणात ट्रक आणि पैसे जप्त करण्यासोबतच त्यात प्रवास करणाऱ्या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
