Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

निवडणूक प्रक्रियेसाठी उपयुक्त “सायबर सुरक्षा ” मार्गदर्शिकेचे प्रकाशन

Spread the love

लोकसभा निवडणूकीत आयोगासह उमेदवार, आणि विविधराजकीय पक्ष सायबर जगताचा मोठ्या प्रमाणात वापर करीत आहेत. निवडणूकविषयक माहितीची सुरक्षितता, संरक्षित पासवर्ड, ईमेल्स, समाज माध्यमवापरताना घ्यावयाची काळजी, फेक न्यूजसह खोडसाळ प्रचार मोहीमराबविण्यासाठी ‘स्पिअर फिशिंग स्कॅम्स’ करणाऱ्यांपासून बचावासाठी कोणत्यादक्षता घ्याव्यात याच्या सूचना ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने ‘सायबर सुरक्षा’या पुस्तिकेद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया अधिक सुटसुटीतपणे करण्यासाठीआयोगाकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा, नव्या ॲप्सचा मोठ्या प्रमाणात उपयोगकेला जात आहे. उमेदवारांसह राजकीय पक्षांनीही समाज माध्यमांचा  वापरप्रचारासाठी सुरु केला आहे. समाज माध्यमांचा गैरवापर होऊ नये आणिनिवडणूक प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या सुरक्षित रहावी यासाठी ‘महाराष्ट्र सायबर’ नेपुढाकार घेतला आहे. राज्यातील सर्व ४८ लोकसभा मतदार संघातील निवडणूकयंत्रणेला मराठी, हिंदी, इंग्रजी, गुजराती आणि ऊर्दू या भाषेतून प्रकाशित केलेल्या‘सायबर सुरक्षा’ मार्गदर्शिकेतून महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्याचे महाराष्ट्रसायबरचे विशेष पोलीस महानिरीक्षक ब्रिजेश सिंह यांनी सांगितले.

या पुस्तिकेत समाजमाध्यमांवरील बातम्याट्रोलिंगप्रायोजित मजकूरयाबाबतीत जनजागृती करण्याच्या सूचनाफेक ॲप्स आणि संकेतस्थळांबद्दलजागृती करण्याबरोबरच व्यक्तिगत आणि बाह्य उपकरणांच्या वापराविषयीदक्षता घेण्याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.

समाज माध्यमांवरील फेक न्यूजची पडताळणी करण्यासाठी मोलाच्या टिप्सदिल्या आहेत.  फेसबुकपोस्टच्या वर उजव्या बाजूच्या कोपऱ्यात ‘ही फेक न्यूजस्टोरी आहे’ हा पर्याय तर व्हॉटसअपवर अफवा अथवा माहिती खातरजमाकरण्यासाठी ‘व्हॉटसअप चेकपॉईन्ट टीपलाईन’ वर पाठविण्याच्या सूचनादेण्यात आल्या आहेत.  व्हॉटसअप वर निवडणुकीच्या संदर्भातील खोट्याबातम्या, अफवा, प्रक्षोभक मजकूर, चित्रांबद्दल सतर्क राहण्यासह त्याविषयीमहत्त्वाच्या टिप्स देण्यात आल्या आहेत.

निवडणूक प्रक्रिया राबविताना कोणत्या गोष्टींमध्ये सावधगिरी बाळगली पाहिजेहे स्पष्ट करतानाच भारत सरकारने धोकादायक म्हणून घोषित केलेल्या ४२ॲप्सची यादी प्रसिद्ध केली आहे. निवडणूक आयोगाच्या सी-जिलसह इतरअधिकृत ॲप्स, संकेतस्थळे तसेच तक्रारींसाठी महत्वाच्या नोडल्स संस्थांचीमाहिती या पुस्तिकेत देण्यात आली आहे. हॅक अथवा हायजॅक झालेल्या सोशलमीडिया खात्यांच्या बाबतीत महाराष्ट्र सायबरशी संपर्क साधण्याचे आवाहनकरण्यात आले आहे.  ही पुस्तिका राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्यासहकार्याने ‘महाराष्ट्र सायबर’ कार्यालयाने तयार केली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!