Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : औरंगाबाद पोलिसांकडून ५ लाखांचा मुद्देमाल जप्त, चौघांना बेड्या

Spread the love

औरंगाबाद – सिडको औद्योगिक पोलिस आणि गुन्हेशाखेने ५ उघडकीस आणत ४ लाख ९०हजारांचा मुद्देमाल जप्त केला. सिडको औद्योगिक पोलिसांनी उस्मानपुरा, सिटीचौक आणि स्वता:च्या पोलिस ठाण्यातील एक असे तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत.


अटक करण्यात आलेल्या चारपैकी दोन चोरतयनाकडून  ७ तोळे सोनं ,एक मोटरसायकल असा मुद्देमाल मुस्तफाखान काल्याखान(२३)रा.आझादचौक व शेख अतिक शेख बाबू (२९) रा. कटकटगेट असा मुद्देमाल  जप्त केला. सी.सी.टिव्ही.फुटेज च्या मदतीने सिडको औद्योगिक पोलिसांनी वरील गुन्हे उघडकीस आणल्याची माहिती पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी दिली. तर ४ मोबाईल हॅंडसेट गुन्हेशाखेने दोन चोरट्यांकडून जप्त करंत दोन गुन्हे उघडकीस आणले आहेत. वरील दोन्ही घुन्हे वेदांतनगर आणि मुकुंदवाडी पोलिस ठाण्यातील आहेत.

दरम्यान सलीम मुगणी शेख(४८) रा.रहेमानिया काॅलनी व अजय बाबासाहेब गायकवाड(२२)रा.मसनतपुर  अशा दोघांकडून ४ मोबाईल हॅंडसेट जप्त करण्यात आले.

या प्रकरणी  सहाय्यक पोलिसआयुक्त विशाल ढुमे व पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांनी केलेल्या मार्गदर्शनाखाली पीएसआय कल्याण शेळके,सहाय्यक फौजदार रमाकांत पटारे, पोलिस कर्मचारी शेख हबीब, राजेंद्र साळुंके यांनी हि कारवाई पार पाडली.आरोपींना वेदांतनगर व मुकुंदवाडी पोलिसांच्या हवाली करण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!