Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : औरंगाबादकरांनो सावधान उद्यापासून जिल्ह्यात ‘ No Vaccine No Entry’ पेट्रोल पंपाच्या वेळेतही बदल

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबादचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्या आदेशानुसार कोरोना लसीकरणाबाबत विविध आस्थापनांसाठी मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या असून आस्थापना चालक/मालकांना लस अनिवार्य करण्यात आली आहे उद्या दिनांक २५ नोव्हेंबरपासून निर्णय लागू होत आहेत.सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाने दिला आहे. दरम्यान औरंगाबाद शहरात उद्यापासून सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत नियमात पेट्रोल वितरण करण्यात येणार असल्याची माहिती पेट्रोल पंप असोशिएनचे सचीव अखिल अब्बास यांनी दिली आहे


कोविड-19 विषाणूच्‍या संसर्गाचा प्रादुर्भाव लक्षात घेता लसीकरण करणे आवश्यक आहे. राज्यातील Covid-19 लसीकरणाचे प्रमाण ७४% असून, औरंगाबाद जिल्ह्याचे लसीकरणाचे प्रमाण केवळ ६४ % एवढे आहे. हे प्रमाण राज्याच्या टक्केवारीच्या तुलनेत अत्यंत कमी असून आहे. संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता विचारात घेता, औरंगाबाद जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात लसीकरण होणे अपेक्षित आहे, जेणेकरुन Covid-19 च्या संभाव्य तिसऱ्या लाटेस प्रभावीपणे आळा घालता येणार आहे. ही बाब लक्षात घेऊन जिल्ह्यातील विविध आस्थापणांमधील कार्यरत मनुष्‍यबळ, चालक/मालक इत्‍यादी व्‍यक्तिंचे लसीकरण अनिवार्य करण्यात आले आहे. या आस्थापनांमध्ये मेडीकल, कॉस्‍मेटीक व सौंदर्य प्रसाधनांची उत्‍पादने करणा-या कंपन्‍या, औषध निर्माते/कंपन्‍या तसेच अॅलोपॅथीक, होमिओपॅथीक, आयुर्वेदीक इत्यादी तत्‍सम सर्व प्रकारच्‍या आस्थापना, ब्‍लडबॅंक, हॉटेल्स किराणा मालाची दुकाने ,बहु-उत्पादन विक्री दुकाने (Multi Product Selling Shops) सर्व प्रकारची दुकाने आस्थापना, रेस्टॉरन्ट्स, भोजनालय, ढाबे, खानावळी, इत्यादी खाद्यसेवा देणाऱ्या आस्थापना, जिल्‍ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने , वाईन/बिअर शॉपी, देशी दारु दुकाने,FL3 अनुज्ञप्‍ती धारक विक्रीचे ठिकाणे इ चा समावेश आहे. सदरचा आदेश २५ नोव्हेंबरपासून लागू करण्यात येत असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

आस्थापनांचे नाव
१. मेडीकल २. कॉस्‍मेटीक व सौंदर्य प्रसाधनांची उत्‍पादने करणा-या कंपन्‍या ३. औषध निर्माते/कंपन्‍या तसेच अॅलोपॅथीक, होमिओपॅथीक, आयुर्वेदीक इत्यादी तत्‍सम सर्व प्रकारच्‍या आस्थापना ४. ब्‍लडबॅंक
मार्गदर्शक सूचना :
१) जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या मेडीकल, कॉस्‍मेटीक उत्‍पादने तयार करणा-या कंपन्‍या/आस्‍थापना, ब्‍लडबॅंक, औषध निर्माते/ कंपन्‍या तसेच अॅलोपॅथीक, होमिओपॅथीक, आयुर्वेदीक इत्यादी तत्‍सम सर्व प्रकारच्‍या आस्थापनेतील व्‍यवस्‍थापकीय यंत्रणेतील सदस्‍य /अधिकारी व्‍यवस्‍थापक, कामगार, तसेच इतर राज्‍यातून नजीकच्‍या काळात रुजू झालेले इतर राज्‍यातुन आलेले कामगार, इतर गावी निवास असलेले व ये-जा (Up-Down-Travel) करणारे कामगार व इतर कार्यरत मनुष्‍यबळ, मेडिकल्‍स आस्‍थापना संबंधी चालक/मालक इत्‍यादी व्‍यक्तिंचे लसीकरण अनिवार्य असेल. औषधी मालाचे बहु-उत्पादन विक्री दुकाने , इत्यादी, सर्व प्रकारची दुकाने आस्थापना मध्ये कार्यरत सर्व मनुष्यबळ यांच्‍या कोविड-१९ प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/ प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.
२ ) जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती व्हावी यादृष्टिने लसीकरण वृद्धींगत करण्यामध्ये सामाजीक जबाबदारी म्हणून सहभाग नोंदवावा.
३ ) उपायुक्त औषध प्रशासन अंतर्गत नोंदणीकृत सर्व उपरोक्त नमुद आस्थापनाच्या ठिकाणी उपायुक्त औषध प्रशासन कार्यालया मार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल व ज्या ठिकाणी ‍कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान १ मात्रा देखील पूर्ण झालेली नसल्याचे आढळुन आल्यास सदर आस्थापना/दुकाने दंडात्मक कारवाईसह सील करण्यात येतील.

आस्थापनांचे नाव
१. किराणा मालाची दुकाने २. बहु-उत्पादन विक्री दुकाने ३. इत्यादी, सर्व प्रकारची दुकाने आस्थापना. सदर आदेशाची अंमलबजावणी दि. २५ नोव्हेंबर सूर्योदयापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

मार्गदर्शक सूचना :
१. जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या दुकाने, आस्थापनेतील चालक/मालक व कामगार यांचे लसीकरण अनिवार्य आहे. किराणा मालाचे बहु-उत्पादन विक्री दुकाने , इत्यादी, सर्व प्रकारची दुकाने, आस्थापना मध्ये कार्यरत विक्री कर्मचारी सहायक कामगार वर्ग, कार्यरत सर्व मनुष्यबळ यांच्‍या कोविड-19 प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/ प्रमुख यांनी करावी. कोविड लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.
२. जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती व्हावी यादृष्टिने लसीकरण वृद्धींगत करण्यामध्ये सामाजीक जबाबदारी म्हणून सहभाग नोंदवावा.
३. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना अधिनीयम अंतर्गत नोंदणीकृत सर्व उपरोक्त नमुद आस्थापनाच्या ठिकाणी उपायुक्त कामगार व अन्‍न व औषध प्रशासन कार्यालया मार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल व ज्या ठिकाणी ‍कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान ०१ मात्रा देखील पूर्ण झालेली नसल्याचे आढळुन आल्यास सदर आस्थापना/दुकाने दंडात्मक कारवाईसह सील करण्यात येतील.

आस्थापनांचे नाव
१. हॉटेल्स २.रेस्टॉरन्ट्स ३ .भोजनालय ४. ढाबे ५. खानावळी ६. इत्यादी खाद्यसेवा देणाऱ्या आस्थापना
सदर आदेशाची अंमलबजावणी दि. नोव्हेंबर सूर्योदयापासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

मार्गदर्शक सूचना :
१.) जिल्ह्यातील सर्व प्रकारचे हॉटेल्स, रेस्टॉरन्ट्स, भोजनालय, ढाबे, खानावळ, इत्यादी खाद्यसेवा देणाऱ्या आस्थापनेतील चालक/मालक व कामगार या कार्यरत सर्वांचे लसीकरण अनिवार्य आहे. नमुद सर्व आस्थापनेतील मनुष्यबळाचे कोविड-१९ प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/ प्रमुख यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक उपाययोजनेचा भाग म्‍हणून लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन सर्व दुकान मालक व विक्री कामगार वर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

२.) ‍जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती व्हावी यादृष्टिने लसीकरण वृद्धींगत करण्यामध्ये सामाजीक जबाबदारी म्हणून सहभाग नोंदवावा.
३.) अन्न व औषध प्रशासन विभाग अंतर्गत नोंदणीकृत सर्व उपरोक्त नमुद आस्थापनाच्या ठिकाणी उपायुक्‍त अन्‍न प्रशासन कार्यालया मार्फत वेळोवेळी तपासणी करण्यात येईल व ज्या ठिकाणी ‍कर्मचारी, कामगार व कार्यरत मनुष्यबळाची लसीकरणाची किमान 01 मात्रा (Dose) देखील पूर्ण झालेली नसल्याचे आढळुन आल्यास सदर आस्थापना/दुकाने दंडात्मक कारवाईसह Seal करण्यात येतील.

आस्थापनांचे नाव
१. जिल्‍ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने २. वाईन/बिअर शॉप ३. देशी दारु दुकाने , ४. FL3 अनुज्ञप्‍ती धारक विक्रीचे ठिकाणे. सदर आदेशाची अंमलबजावणी दि. २५ नोव्हेंबर पासून ते पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

मार्गदर्शक सूचना :
१. ) जिल्ह्यातील सर्व मद्यविक्री दुकाने, वाईन/बिअर शॉप, देशी दारु दुकाने, FL3 अनुज्ञप्‍ती धारक मद्य व मद्यार्क विक्रीचे ठिकाणे आस्‍थापनांमध्ये कार्यरत कामगार व मनुष्यबळ यांची कोविड-19 प्रतिबंधात्‍मक लसीकरणाच्‍या दोन मात्रा पूर्ण झाल्‍याची खातरजमा संबंधित आस्थापनाचे मालक/अनुज्ञप्‍तीधारक यांनी करावी. कोविड प्रतिबंधात्‍मक लसीकरण पूर्ण झाल्‍याचे अंतिम प्रमाणपत्र संबंधित दुकाने आस्‍थापना मालकाने त्यांच्या अधिनस्त मनुष्यबळ व कामगारांकडून प्राप्‍त करुन घ्‍यावे. ज्या कार्यरत कामगारांचे, मनुष्यबळाचे लसीकरणासाठी काही अडचण असल्‍यास नजीकच्‍या लसीकरण केंद्रात जावे किंवा लसीकरणाचे विषेश सत्र आयोजित करावे, जेणेकरुन विक्रेता व ग्राहकवर्ग यांचे लसीकरण पूर्ण होईल याची खातरजमा करावी.

२. ) जिल्ह्यात अधिक जोमाने लसीकरणाची उद्दिष्टपूर्ती व्हावी यादृष्टिने लसीकरण वृद्धींगत करण्यामध्ये सामाजीक जबाबदारी म्हणून सहभाग नोंदवावा.
उपरोक्त सर्व नमुद आस्थापनाच्या ठिकाणी अधीक्षक राज्‍य उत्‍पादन शुल्‍क यांच्‍या मार्फत ज्या ठिकाणी कामगार व कार्यरत मनुष्यबळाची, ग्राहकांची लसीकरणाची किमान ०१ मात्रा पूर्ण झालेल्या असतील अश्याच मद्य विक्रेत्‍यांना मद्य विक्रीसाठी दुकाने चालू ठेवण्‍यास मुभा राहील व ग्राहकांना मद्य खरेदीस मुभा राहील. याबाबत नियमांचे उल्‍लंघन झाल्‍याचे आढळून आल्‍यास व वीना- लसीकरण दुकाने खुली केल्‍यास अशी दुकाने सील करण्‍याची कारवाई करण्‍यात येईल.

वरील मार्गदर्शक सूचना व कोविड- १९ लसीकरणाबाबतच्‍या निर्देशाचे राज्‍य उत्‍पादन शुल्‍क विभागांतर्गत अनुज्ञप्‍तीधारक अस्‍थापनाकडून काटेकोरपणे पालन करवून घेण्‍याची सर्वस्‍वी जबाबदारी विभाग प्रमुख म्‍हणून अधीक्षक राज्‍य उत्‍पादन शुल्‍क यांची राहील.

उपरोक्त सर्व बाबींसाठी Covid Appropriate Behavior (CAB) अनिवार्य आहे.
1) मास्क वापरणे 2) 2 गज दुरी (6 फुट अंतर) 3) सॅनीटायझरचा वापर 4) आवश्यकते नुसार फेसशिल्ड वापरणे अनिवार्य

विशेष सूचना
१. लोकजागृतीतून लसीकरण मोहीम राबविण्यावर भर देण्यात यावा. लसीकरणास पात्र लाभार्थ्यांचे,१००% लसीकरण (प्रथम मात्रा : First Dose) झाले पाहिजे. लसीकरणाचा दुसरा डोस Covishield -८४ दिवस व Covaxin-२८ दिवसांनी घेणे अनिवार्य आहे. त्यासाठी प्रथम मात्रा विहित कालावधी पूर्ण झालेल्या नागरिकांकडे “हर घर दस्तक व माझा वार्ड शतप्रतीशत लसीकरण वार्ड” या कार्यक्रमांतर्गत दुसऱ्या डोससाठी पाठपुरावा करावा.
२. माझी भूमी संतांची भूमी : संतांच्या भूमीत करुया १०० % लसीकरण या कार्यक्रमातंर्गत पाठपुरावा करावा व ठोस जनप्रबोधन करुन लसीकरण मात्रा वाढवावी.

अन्यथा कठोर दंडात्मक कारवाई

३. Covid Appropriate Behavior (CAB) उल्लंघन करणा-यांवर कठोर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच निम्न स्वाक्षरीकार प्रस्तुत आदेश आवश्यकतेनुसार जिल्हाधिकारी रद्द किंवा सुधारित करु शकतील. सदर आदेशाची अंमलबजावणी पुढील आदेशापर्यंत लागू राहील.

सदर आदेशाची कोणतीही व्यक्ती, संस्था किंवा संघटना यांनी अंमलबजावणी करण्यास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधीत आपत्ती व्यवस्थापन कायदा,२००५ चे कलम ५१ ते ६० व भारतीय दंड संहिता १८६० चे कलम १८८ तसेच साथरोग कायदा १८९७ अन्वये दंडनीय/कायदेशीर कार्यवाहीस पात्र राहतील असेही जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

पेट्रोल पम्प असोसिएशनचे आवाहन

सकाळी ८ ते संध्याकाळी ७ पर्यंत नियमात पेट्रोल वितरण

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्य आदेशानंतर उद्यापासून ज्या नागरिकांकडे लसीकरणाचे सर्टफिकेट आहे. त्यांनाच शहरातील सर्व पंपावरून सकाळी ८ते संध्याकाळी ७यावेळेत पेट्रोल वितरीत करण्यात येणार आहे .तरी शहरातील सुज्ञ नागरिकांनी आम्हास सहकार्य कारावे असे आवाहनअसोशिएनचे सचीव अखिल अब्बास यांनी प्रसिधद केलेल्या पत्रकात केले आहे

आपलं सरकार

Click to listen highlighted text!