Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : वृध्दाला गंडवणारा सायबर पोलिसांनी पकडला

Spread the love

औरंगाबाद – रिलायन्स जिओची  इंटरनेट सेवा देण्याचा बहाणा करंत वृध्दाला गंडवणार्‍या भामट्याला सायबर पोलिसांनी अटक केले. समीरखान मुख्त्यारखान(२५) रा.इंदीरानगर बायजीपुरा असे अटक आरोपीचे नाव आहे.

दोन महिन्यांपूर्वी नंदनवनकाॅलनीत राहणारे दयानंद निमाले (६८) यांना रिलायन्स जिओ कंपनीचे इंटरनेट कनेक्शन देतो असे सांगत निमाले यांचे डाॅक्यूमेंट आॅनलाईन मागवले व सोबत ४ हजार ८५०रु.घेतले. पण इंटरनेट सेवा पुरवली नाही.आरोपी समीरखान ला संपर्क केला असता त्याने आईच्या मृत्यूचे कारण सांगितले. म्हणून निमाले यांना संशय आल्यामुळे त्यांनी जिओ च्या शहरातील कार्यालयात संपर्क केला.त्यावेळी समीरखान नावाचा कोणीही व्यक्ती रिलायन्स जिओ सोबंत काम करंत नसल्याचे निमाले यांना कळाले.

समीरखान ने शहरातील अनेक नागरिकांना असे फसवल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासात उघंड होत असल्याचे पोलिसांनी सांगितले.वरील कारवाई पोलिस उपायुक्त अपर्णा गिते, सहाय्यक पोलिस आयुक्त विशाल ढुमे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पातारे, एपीआय अमोल सातोदकर,पीएसआय राहूल चव्हाण, पोलिस कर्मचारी सोनाली वडनेरे,संगीता दुबे यांनी पार पाडली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!