Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : निर्बंध वाढवण्याच्या भूमिकेला विरोध,उद्या भूमीका स्पष्ट करणार : खा. इम्तियाज जलील

Spread the love

औरंगाबाद – मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी कोरोनाचे कारण पुढे करंत पुन्हा शहरात निर्बंध वाढवले आहेत. या शासकिय निर्णयाला आपला २०० टक्के विरोध असल्याची माहिती  खा.इम्तियाज जलील यांनी महानायक ऑनलाईनशी बोलताना दिली.

खा.इम्तियाज जलील म्हणाले कि , गेल्या  दोन दिवसांपासून मी पक्ष संघटनेच्या कामानिनित्त मुंबईत होतो. थोड्यावेळा पूर्वीच शहरात आलो आहे. उद्या शहरातील तज्ज्ञ डाॅक्टरांचे पथक, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी, आणि जवाहरनगर, पुंडलिकनगर आणि शहरातल्या इतर ठिकाणामधील छोट्या व्यापार्‍यांशी प्रत्यक्ष भेटून त्यांच्याशी चर्चा करणार  आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सहकारी पक्षांना जनतेला वेठीस का धरावं वाटतं, परिस्थिती खरंच एवढी गंभीर आहे का ? लाॅकडाऊन लावण्याने आणि निर्बंध वाढवल्याने कोरोना कसा नियंत्रणात राहतो का ? या प्रश्नांची उत्तरे मला अद्याप मिळाली नाहीत.ती राज्यशासनाने मिळवून देण्यास आपल्याला मार्गदर्शन करावे असा टोलाही शेवटी खा.आम्तियाज जलील यांनी लगावला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!