Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

रेकाॅर्डवरच्या गुन्हेगाराकडून दोन जिवंत काडतूसासह,गावठी कट्टा जप्त,दौघांना अटक

A controversial program which can turn your iphone into a fake gun ....

Spread the love

औरंगाबामध्ये रेकाॅर्डवरच्या गुन्हैगाराकडून गावठी कट्ट्यासहित दोन जिवंत काडतूसे गुन्हेशाखेने जप्त केली आहेत.या प्रकरणी वाळूज औद्योगिक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
अनिरुध्द उर्फ बाळू भारत मिसाळ (२९) रा. लीलासन्स सोसायटी एमआयडीसी वाळूज आणि बळीराम ज्ञानोबा वाघमारे (२०) रा. बजाजनगर अशी अटक आरोपींची नावे आहेत. या पैकी बाळू मिसाळ हा रेकाॅर्डवरचा गुन्हेगार असून वाळूज औद्योगिक पोलिस ठाणे, सिडको पोलिस ठाणे या ठिकाणी शरीराविरुध्द चे आणि विनयभंगाचे गुन्हे बाळू मिसाळ विरोधात दाखल आहेत. २०१६ साली बेगमपुर्‍याचे तत्कालीन नगर सेवक ज्ञानेश्वर जाधव यांच्या मुलासोबंत बाळू मिसाळ चे भांडण झाले होते. या प्रकरणात ज्ञानेश्वर जाधव यांच्या मुलावर ३०७ चा गुन्हा दाखल होता. तेंव्हापासुन बाळू मिसाळ स्वता:च्या रक्षणासाठी गावठी कट्टा वापरत असल्याचे पोलिसांनी सांगितले.आरोपी मिसाळ चा मित्र बळीराम वाघमारे याचे वाळूज औद्योगिक परिसरात केक शाॅप आहे. मिसाळ ने वाघमारे कडे गावठी कट्टा ठेवायला दिल्याची माहिती गुन्हेशाखेला मिळाली त्यानुसार पीएसआय अमोल देशमुख यांच्या पथकाने वरील कारवाई केली. या कारवाईत एएसआस नंदू भंडारे, पोलिस कर्मचारी किरण गावंडे, धर्मराज गायकवाड नितीन देशमुख यांनी सहभाग घेतला होता.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!