Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadNewsUpdate : कमालच झाली !! पती -पत्नी दोघेही डॉक्टर पण मुलगी झाल्यामुळे पतीने केले हे कृत्य …

Spread the love

औरंगाबाद – डाॅक्टर दांपत्याला मुलगी झाल्यामुळे संतप्त पतीने पत्नीला तलाक दिला. या प्रकरणी वाळूज पोलिस ठाण्यात तीन तलाक प्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकारने तिहेरी तलाक कायदा  आणून मुस्लीम समाजातील तलाक पद्धतीला लगाम घातला. पण, अजूनही कायद्याचे उल्लंघन होत असल्याचे प्रकार समोर आले आहे.  औरंगाबाद जिल्ह्यात लिंबेजळगावात उपचारासाठी रुग्णालयात आलेल्या रुग्णासमोरच डॉक्टरने आपल्या पत्नीला तलाक दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी डाॅ.जमील शेख यांचे २०१७साली लिंबेजळगावच्या डाॅ. समीना यांच्याशी विवाह झाला होता.आरौपी जमील बशीर शेख रा. बोरगाव साकनी ता. सिल्लोड या दुर्गम भागाचा रहिवासी आहे, म्हणून डाॅ.यांच्या वडलांनी जावाई आणि मुलीला लिंबेजळगावात दवाखाना सुरु करुन दिला. दरम्यान डाॅ.जमील यांना समीना पासुन एक मुलगी झाल्यामुळे आॅक्टोबर २०मधे डाॅ. जमील ने समीना ला तलाक दिला. या प्रकरणी पुढील ततपास पोलिस निरीक्षक संदीप गुरमे यांच्या मार्गदर्शनाखाली वाळूज पोलिस करंत आहेत

दरम्यान दोघेही डॉक्टर पती-पत्नी हे लिंबेजळगावात राहून डॉक्टरांची सेवा करून उपजिविका भागवित होते. याच दरम्यान समिना यांना मुलगी झाली. मुलगी झाल्यामुळे सासरच्या मंडळीनी डॉ. समिना यांचा छळ सुरू केला. मुलगी झाल्याच्या कारणावरून समिना यांना शिवीगाळ, मारहाण तसंच शारिरीक आणि मानसिक त्रास दिला जात होता. हा वाद दिवसेंदिवस विकोपाला जात होता. २३ ऑक्टोबर रोजी डॉ. समिना या आपल्या रुग्णालयात काम करत होत्या. तेव्हा त्यांचे पती डॉ. जमिल यांच्यासोबत पुन्हा कुठल्या तरी कारणावरून वाद सुरू झाला. दोघांमध्ये रुग्णालयातच भांडण पेटले होते. भांडणात संतप्त झालेल्या जमिल यांनी रुग्णालयात एका रुग्णाचे उपचार सुरू असताना त्याच्यासमोरच डॉ.समिना यांनी तोंडी तलाक दिला. तोंडी तलाक देणे हा कायद्याने गुन्हा आहे. जमिल यांच्या या कृत्यामुळे समिना यांना मोठा धक्का बसला. त्यामुळे थेट वाळूज पोलीस स्टेशन गाठले आणि पती डॉ. जमिल यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!