MaharashtraCrimeUpdate : लज्जास्पद : उच्चपदस्थ दारुड्या पित्याने स्वतःच्या मुलीवरच केले लैंगिक अत्याचार

मुंबईत बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी लज्जास्पद घटना उघडकीस आली आहे. या धक्कादायक वृत्तानुसार एका बहुराष्ट्रीय कंपनीत वरिष्ठ पदावर कार्यरत असणाऱ्या बापाने १४ वर्षाच्या स्वतःच्या मुलीवरच लैंगिक अत्याचार केले आहेत. पीडित मुलीने आपल्या आईला झालेला प्रकार सांगितल्यानंतर आईने उजैन पोलिसांत तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आरोपी बापाकडून पीडितेवर गेल्या १२ जूनपासून हा पिता म्हणविणारे नराधम सातत्यानं लैंगिक अत्याचार करीत होता असे पीडितेनं तक्रारीत म्हटलं आहे.
“पीडित मुलीनं सोमवारी दिलेल्या फिर्यादीवरून भादंवि आणि पोक्सो कायद्यान्वये आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा गुन्हा मुंबईत घडला आहे. त्यामुळे हे गुन्हा महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग करण्यात येणार आहे,” अशी माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक अमरेंदर सिंग यांनी दिली.
या प्रकरणात ‘टाईम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी मुंबईत एका बहुराष्ट्रीय कंपनी मोठ्या पदावर कामाला असून, १२ जून रोजी आरोपीनं मुलीवर पहिल्यांदा बलात्कार केला. त्यानंतर आरोपीनं मुलीचं सातत्यानं लैंगिक शोषण केलं. बापाकडून वारंवार लैंगिक शोषण होत असतानाच पीडिता काही दिवसांसाठी आपल्या आजोळी उज्जैनला गेली होती. तिथे काही दिवस राहिल्यानंतर तिने पुन्हा मुंबईत येण्यास नकार दिला. त्यामुळे तिच्या आईने विचारणा केली. त्यानंतर पीडितेनं बापाकडूनच होत असलेल्या अत्याचाराची भयंकर गोष्ट आईला सांगितली. महिलेनं मुलीसह महिला पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली.
उजैन पोलिसांना अल्पवयीन पीडितेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे कि , दि. १२ जून रोजी जेव्हा तिची आई आजारी होती, तेव्हा वडील तिच्या बेडरुममध्ये आले आणि तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर आरोपीने अनेकवेळा मुलीवर अत्याचार केले. जेव्हा मुलीने अत्याचाराला विरोध केला. तेव्हा आरोपीनं तिला बहुमजली इमारतीत उंचावर असलेल्या त्यांच्या घरातून खाली फेकण्याची धमकी दिली होती, असं पीडितेनं म्हटलं आहे. दरम्यान पीडितेच्या आईनेही आरोपीवर गंभीर आरोप केले आहेत. आरोपीनं घरात सीसीटीव्ही लावलेले असून, मुलीसोबत केलेल्या अत्याचाराच्या चित्रफितीही तयार केल्या आहेत. आरोपी दारूच्या आहारी गेलेला असून, मागील १६ वर्षांपासून नशेत येऊन सातत्यानं मारहाण करतो. महिलेनं पतीविरोधात अनेक वेळा पोलिसांमध्ये तक्रारी केल्या. मात्र, प्रत्येक वेळी आरोपी माफी मागायचा आणि घरी गेल्यानंतर पुन्हा मारहाण करायचा. त्यातून दोघांमध्ये दररोज भांडण होत होती. त्यामुळे महिला चार महिन्यांपूर्वी माहेरी उज्जैनला निघून गेली होती.