AurangabadCrimeUpdate : कोरोनाकाळातही बिनधास्त चालू होता कुंटणखाना, गुन्हेशाखेची कारवाई , आंटीसह दोन पीडिता पोलिसांच्या ताब्यात…

Advertisements
Advertisements
Spread the love

 

औरंंंगाबाद : गारखेडा परिसरातील वसंतनगरात गेल्या अनेक दिवसापासून बिनबोभाटपणे सुरू असलेल्या कुंटनखान्यावर गुन्हेशाखा पोलिसांनी गुरूवारी (दि.३०) सायंकाळी छापा मारला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कुंटनखाना चालविणार्‍या एका आंटीसह देहविक्री करण्यासाठी आलेल्या दोन पीडित तरूणींना ताब्यात घेतले.
गारखेडा परिसरातील हेडगेवार रूग्णालयाजवळ असलेल्या वसंतनगरात गेल्या अनेक दिवसापासून कुंटनखाना सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. गुन्हेशाखेचे सहाय्यक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, पोलिस निरीक्षक अनिल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्या पथकाने गुरूवारी सायंकाळी कुंटनखान्यावर एका पंटरला पाठविले. पंटरने सौदा झाल्यावर पोलिसांना इशारा करताच पोलिसांनी कुंटनखान्यावर छापा मारला. या कारवाईदरम्यान पोलिसांनी कुंटनखाना चालविणार्‍या आंटीसह देहविक्री करण्यासाठी आलेल्या दोन पीडित तरूणींना ताब्यात घेतले. याप्रकरणी सायंकाळी उशिरापर्यंत जवाहरनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू होती.

Advertisements

कर्ण -कर्कश्य हॉर्न धारकांविरुद्ध सलग दुसर्‍या दिवशीही कारवाई

औरंंंगाबाद : फॅन्सी सायलेंन्सर असलेल्या बुलेट आणि भरधाव वेगाने धावणार्‍या स्पोर्टस बाईक चालकाविरूध्द शहर वाहतूक शाखा पोलिसांनी बुधवारपासून कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. शहर वाहतूक शाखा पोलिसांनी सलग दुसर्‍या दिवशी गुरूवारी (दि.३०) देखील फॅन्सी आणि मोठा आवाज करणार्‍या बुलेटधारकांवर कारवाई केली. तसेच पोलिसांनी प्रेशर हॉर्न लावून मिरवणार्‍याविरूध्दही कारवाई केली असल्याची माहिती वाहतूक शाखेचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिली.
बुलेटला कंपनीने बसविलेले सायलेंन्सर काढुन त्या ठिकाणी फॅन्सी आणि मॉडीफाईड सायलेंन्सर लावून फिरणार्‍या बुलेटधारकांवर तसेच स्फोर्टस बाईक आणि प्रेशर हॉर्न लावणार्‍याविरूध्द पोलिसांनी कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. सलग दुसर्‍या दिवशी वाहतूक शाखा पोलिसांनी २० बुलेटधारकांवर कारवाई करण्यात आली. पोलिस निरीक्षक मुकुंद देशमुख यांच्या पथकाने पोलिस आयुक्तालयासमोर बॅरीकेट लावून कारवाईची मोहिम राबवली.

Advertisements
Advertisements

Leave a Reply

आपलं सरकार