AurangabadCrime : खेळणी विक्रेत्याला गंडविणा-या नोकराच्या कोठडीत वाढ, ४५ लाखाहून अधिक रक्कमेची फसवणूक

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : खेळणी विक्रेत्या घाऊन व्यापा-याशी हातमिळवणी करुन नोकराने मालकालाच ४५ लाख ६८ हजारांना गंडविल्याचा उघडकीस आल्यावर २४ जुलै २०१९ रोजी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात नोकर दत्तप्रसाद सुभाषचंद्र लोया (रा. बालाजीनगर) याच्यासह घाऊक विक्रेता पंकज कैलाशचंद खंडेलवाल (रा. शारदाश्रम कॉलनी, पैठणगेट) आणि त्याचा नोकर रवी शिवाजी पानखेडे (रा. मुकुंदवाडी) यांच्याविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी दत्तप्रसाद लोया याला अटक केली आहे.
समर्थनगरातील सचिन सुगनचंद चितलांगी यांचे गुलमंडी भागात चितलांगी गिफ्ट व टॉईज, एल. आर. चितलांगी व वैष्णवी फन अशी तीन दुकाने आहेत. या तिन्ही दुकानांचे व्यवहार सचिन स्वत: सांभाळतात. त्यांच्या दुकानात २०१४ पासून दत्तप्रसाद हा नोकर म्हणून कामाला होता. नजीकचा नातेवाईक असल्याने सचिन यांचा त्याच्यावर विश्वास होता. दुकानातील महत्त्वाच्या कामकाजाशिवाय हिशेब व आर्थिक व्यवहार देखील तो पाहायचा. मात्र, २०१५ मध्ये सचिन यांच्या समर्थनगरातील घराचे बांधकाम सुरू असल्याने त्यांचे व्यवसायाकडे दुर्लक्ष झाले. याचकाळात दत्तप्रसाद व खंडेलवाल यांनी हातमिळवणी करुन खोटी बिले तयार केली होती. दुकानात माल येत नव्हता पण सचिन यांच्याकडून न मिळालेल्या मालाचे पैसे दत्तप्रसाद मार्फत खंडेलवाल आणि पानखेडे घेऊन जात होता. हे प्रकरण उजेडात आल्यावर आर्थिक गुन्हे शाखेने तपास करुन सचिन यांच्या तक्रारीवरुन क्रांतीचौक पोलिसात गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी २२ जून रोजी दत्तप्रसादला क्रांतीचौक पोलिसांनी अटक केली आहे.

Advertisements

आपलं सरकार