Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#AurangabadNewsUpdate : जालन्याहून दारूची तस्करी , पोलिसांसहित चौघांना अटक, सात लाखांची विदेशी दारू जप्त

Spread the love

औरंगाबाद -कडक लॉक डाउनच्या काळात खाकी वर्दीत शहरात विदेशी दारूची तस्करी करणा-या क्रांतीचौक  पोलीस ठाण्याच्या कर्मचा-यासह चार जणांना बदनापूर  पोलीसांनी अटक केली. त्यांच्या ताब्यातून विदेशी दारूचे बॉक्स आणि कार असा एकुन सात लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

औरंगाबाद  शहर रेड झोन मध्ये असल्याने जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्यत देशी ,विदेशी दारू बंदी कायम ‘ेवली आहे तर जालना जिल्ह्यात  कोरोना बाधितांची संख्या अल्प असल्याने या जिल्ह्यात वाईन  शॉप व देशी दारू दुकांनाना परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे औरंगाबादेतील अनेक जण हे दारू मिळविण्यासा’ी जालना जिल्ह्यात  प्रवेश करून वाहनातून दारू नेत असल्याचे समोर आले आहे॰ २७ मे रोजी जालना येथून (एम एच २० ई जी ९२१२) या टॉयटो कंपनीच्या कार मध्ये  पोलीस खाकी वर्दीत तस्करी करत असल्याची माहिती बदनापूर पोलीसांना मिळाली होती. यावरून पोलीस निरीक्षक एम बी खेडकर यांच्या पथकाने सापळा रचून पोलीस ‘ाण्यासमोर कार अडवली असता कारमध्ये एक पोलीस कर्मचारी व अन्य तीन जण बसलेले दिसले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता कारमध्ये महागड्या विदेशी दारूचे ४ बॉक्स व १ फुटलेला बॉक्स मिळून आला. दारूचे बॉक्स त्यांनी जालना शहरातील दीपक व रुपम या दोन वाइन शॉप मधून खरेदी करून औरंगाबाद शहरात  नेत असल्याचे सांगितले.

या प्रकरणी बदनापूर  पोलीसांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस जमादार श्याम रघुनाथ मोहळ याच्यासह सतीश शिवाजी देखणे, जितेंद्र अशोक चोटलानी, अविनाश अशोक चोटलानी यांच्यासह दीपक वाइन शॉप व रुपम वाइन शॉप चालकविरुद्ध गुन्हा दाखल केला.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!