Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad LockDown : महत्वाची सुधारित बातमी : आणखी एक मृत्यू तर रुग्णसंख्या 901 वर , 20 मे पर्यंत तर घरात बसाच…. पण 24 मे पर्यंत वाढू शकतो कडक कर्फ्यू …..

Spread the love

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि संसर्गाची साखळी तोडण्यासाठी विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी औरंगाबाद शहरामध्ये 20 मे बुधवार पर्यंत लॉकडाऊन जाहिर केला आहे. या लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी यावेळी दिले.
शहरात पोलिस प्रशासनाकडून कंन्टेनमेंट झोनमध्ये चोख बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे. कंन्टेनमेंट झोनमधून नागरिकांचे बाहेरील भागात तसेच बाहेरील भागातील नागरिकांचे कंन्टेनमेंट झोनमध्ये होणारी आवागमन बुधवार पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश पोलिस प्रशासनाला दिले आहेत. स्थानिक पातळीवरची परिस्थिती लक्षात घेऊन विभागीय आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी आणि महानगर पालिका आयुक्त यांच्या समन्वयातून हा निर्णय घेतलेला आहे. 20 मे पर्यंत रुग्णवाढीचा वेग कमी न झाल्यास हा लॉकडाऊन रविवार 24 मे पर्यंत वाढविण्याची शक्यता आहे. 24 मे पर्यंत देखील रुग्णसंख्या वाढतच राहिली तर 24 मे नंतर दररोज केवळ 7 ते 11 पर्यंतच सुट देण्यात येईल.   लॉकडाऊनच्या काळात कंन्टेनमेंट झोनमध्ये जिवनावश्यक वस्तुंचा तुटवडा होणार नाही याबाबत खबरदारी घेण्याच्या सुचना संबंधित यंत्रणांना देत नागरिकांनीही सहकार्य करुन कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करण्याचे आवाहन विभागीय आयुक्तांनी यावेळी केले.

जिल्ह्यात 901 कोरोनाबाधित, आज 59 रुग्णांची वाढ

औरंगाबाद शहरात आज 59 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या 901 झाली असल्याचे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
औरंगाबाद शहरातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे. एमजीएम मेडिकल कॉलेज (3), हनुमान चौक, चिकलठाणा (1), राम नगर (3), एमआयडीसी (1), जालान नगर (1), संजय नगर, लेन नं.6 (3), सादात नगर (4), किराडपुरा (1), बजाज नगर (1), जिनसी रामनासपुरा (1), जुना मोंढा, भवानी नगर, गल्ली नं. पाच (1), जहागीरदार कॉलनी (1), आदर्श कॉलनी (1), रोशन गेट (1), शंभू नगर (7), सिटी चौक (1), कैलास नगर (1), चाऊस कॉलनी (1), मकसूद कॉलनी (2), हुसेन कॉलनी (4), जाधववाडी (1), न्यू बायजीपुरा, गल्ली नं.3 (1), एन सहा, संभाजी कॉलनी, सिडको (1), कटकट गेट (1), बायजीपुरा (10), अमर को- ऑपरेटिव्ह सोसायटी, एन आठ, सिडको (2), लेबर कॉलनी (1), जटवाडा (1), राहुल नगर (1) आणि जलाल कॉलनी (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत. यामध्ये 33 पुरुष आणि 26 महिला रुग्णांचा समावेश आहे. तर 255 जण कोरोनामुक्त झाले आहेत.  दरम्यान राहुल नगरातील 60 वर्षीय महिलेचा 15 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यांचा कोरोना तपासणी अहवाल आज पॉझिटिव्ह आल्याने आजपर्यंत 26 रुग्णांचा कोरोना आजारामुळे मृत्यू झालेला आहे, असेही कळवण्यात आले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!