Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime Update : संचारबंदी आणि जमाव बंदीच्या आदेशाचे उल्लंघन , चार फळ विक्रेत्यांसह १२ जणांवर गुन्हा

Spread the love

औरंगाबाद : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी औरंगाबाद शहरात राज्य शासनाच्या आदेशान्वये जमावबंदी लागू करण्यात आली आहे. जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या चार फळ विक्रेत्यांसह एक हॉटेल चालक व दुधविक्री केंद्राच्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाय योजना करण्यात येत आहेत. रस्त्यावर आणि बाजारपेठेत होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी राज्य शासनाच्या वतीने अगोदर जमावबंदी लागू करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करुन सिडको एन-5 येथील एसबीआय बँकेसमोर फळ विक्री करणारे शेख फारुख रशीद बागवान (24, रा. बायजीपुरा), शेख सईद शेख हमीद (28, रा. बेरीबाग, हर्सुल), अफजल खान अजिज खान (45, रा. मिसारवाडी), शेख एजाज शेख रशीद (35, रा. बायजीपुरा) या चौघांसह एन-6, येथील संभाजी कॉलनीतील दुध विक्रेता महेश बाजीराव पवार (27) व हॉटेल चालक मुस्तफा इब्राहिम शाह (33, रा. चिश्तीया कॉलनी) अशा सहा जणांविरुद्ध सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
———-
हातभट्टीची दारु तयार करणारी महिला गजाआड
औरंगाबाद : अवैधरित्या हातभट्टीची दारु तयार करणार्‍या महिलेला पोलिलसांनी गजाआड केले. ही कारवाई 11 एप्रिल रोजी चार वाजेच्यासुमारास नारेगाव परिसरातील चमचम नगरात करण्यात आली. संशयीत महिलेकडून 940 रुपये किंमतीचे दारु तयार करण्याचे साहित्य पोलिसांनी जप्त केले असुन तिच्या विरुद्ध एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिस नाईक शेख अर्शद करित आहेत.
———-
जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन
औरंगाबाद : जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या सहा जणांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई 11 एप्रिल रोजी दुपारी 11 वाजेच्यासुमारास औरंगपुर्‍यातील महात्मा फुले चौकात करण्यात आली. योगेश गुलाबराव बन (रा. मुकुंदवाडी), प्रभाकर देवमन बकले (रा. हर्सुल), रवि बाबुराव गायकवाड (रा. सिडको), बी.एच. गायकवाड (रा. मिलकार्नर) व इतर एक अशी संशयीतांची नावे असुन त्यांच्यावर क्रांतीचौक पोलिस ठाण्यात कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 144 (1),(3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार निकम करित आहेत.
———-
संचारबंदीचे उल्लंघन; सहा जणांवर गुन्हा
औरंगाबाद : संचारबंदीचे उल्लंघन करून रस्त्यावर विनाकारण फिरणारे वाहनधारक आपली व्यापारी प्रतिष्ठाने उघडी ठेवुन आदेशाचे पालन न करणार्‍या सहा जणांविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात 3 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आदेशाचे उल्लंघन करुन विनाकारण रस्त्यावर फिरणारा अब्दुल आरेफ अब्दुल रशीद (52, रा. खोकडपुरा), शेख नाजेम शेख शकील, शेख रिजवान शेख समद, सय्यद शारेक सय्यद बाबा (सर्व रा. शरीफ कॉलनी) व दुध डेअरी चालक मुसेदखान गयास खान (30, रा. कटकटगेट) व शेख नसुरुद्दीन शबीरुद्दीन (34, रा. रहेमानिया कॉलनी) अशा सहाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!