Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : खबरदार ; कोरोनाच्या नावाने एप्रिल फूल कराल तर थेट जेलमध्ये जाल, संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करणा-या ५८ जणांवर गुन्हे दाखल

Spread the love

खबरदार ; कोरोनाच्या नावाने एप्रिल फूल कराल तर जेलमध्ये जाल

औरंंंगाबाद : कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या देशभरात लॉकडाऊन लागू करण्यात आल्याने नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बध घालण्यात आले आहे. परिणामी, बहुतेकजण हे दिवसातील सर्वाधिक वेळ सोशल मीडियावर घालविताना दिसून येत आहे. सोशल मिडियावर आक्षेपार्ह संदेश पाठविणा-यावर आता थेट गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती सायबर पोलिस ठाण्याच्या सूत्रांनी दिली आहे.
कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर सध्या सर्वजण व्हाट्सपवर वेगवेगळे मॅसेज पाठत आहेत. दिवसभरात शेकडो मॅसेज फिरतात त्याला कोणताही आधार नसतो. मात्र, अनेक जण आलेला मॅसेज तसाच पुढे फॉरवर्ड करतात. त्यामुळे ब-याचदा चुकीची माहिती समाजात पसरली जात आहे. दरम्यान, पोलीस उपायुक्त ( मुख्यालय) मीना मकवाना यांनी कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ६८ नुसार नोटीस जारी केली असून यात नमूद केल्याप्रमाणे एप्रिल महिन्यात बरेच लोक हे आपले नातेवाईक यांना एप्रिल फुल करत असतात. त्यातून एक वेगळा आनंद मिळतो मात्र, सध्यास्थितीत आपल्यावर असणारे कोरोना व्हायरसचे संकट तसेच संचारबंदी यामुळे आपण कोरोना व्हायरसच्या संदर्भाने कोणत्याही प्रकारचे लोकांच्यामध्ये संभ्रम निर्माण करतील अश्या प्रकारचे मेसेज टाकु नये अथवा सोशल मिडीयावर व्हायरल करु नये.जर अशा स्वरुपाचे मेसेज आपल्याकडुन सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यास मॅसेज पाठविणाNयावर थेट गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.

सोशल मिडियावर सायबर पोलिसांचे लक्ष
गेल्या काही दिवसापासून कोरोना विषयी वेगवेगळी माहिती असलेले संदेश सोशल मिडियावर पसरत आहेत. सोशल मिडियावर आक्षेपार्ह व संभ्रम निर्माण करणारे संदेश  पाठविणा-यावर  सायबर पोलिसांचे बारकाईने लक्ष ठेवले आहे. कोरोनाचा संदर्भ घेवून कोणाला एप्रिल पुâल करण्याचा प्रयत्न करू नये असे आवाहन सायबर पोलिस ठाण्याच्या निरीक्षक गिता बागवडे यांनी केले आहे.


औरंंंगाबाद : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाचे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये उल्लंघन करणा-या ५८ जणांविरूध्द शहरातील विविध पोलिस ठाण्यात ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सर्वाधीक १० गुन्हे जिन्सी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत.
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र  शासनाने २१ दिवसाचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. तर राज्य शासनाने ३१ मार्च पर्यंत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करून फिरणा-याविरूध्द राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ चे कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोविड-१९ उपाययोजना २०२० चे कलम ११ अन्वये गुन्हे दाखल करण्यास पोलिसांनी सुरूवात केली आहे.
शहरातील विविध पोलिस ठाण्यात ५८ व्यक्तीविरूध्द ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यात जिन्सी-१०, सिटीचौक-४, सिडको-८, मुकुंदवाडी -४, छावणी -४, बेगमपूरा-३, वाळूज-२,एमआयडीसी सिडको-२, दौलताबाद-२, पुंडलिकनगर-२, तर हर्सुल, वेदांतनगर, क्रांतीचौक पोलिस ठाण्यात प्रत्येकी १ असे एवूâण ४५ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!