Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बळकावलेल्या जागेत थाटला पत्त्याचा क्लब, गुन्हे शाखेने छापा मारुन अड्डा केला उध्दवस्त, १५ जुगाऱ्यांना अटक

Spread the love

औरंगाबादच्या गांधीनगरातील रविवार बाजारतळावरील व्यापा-याची जागा बळकावून त्यावर पत्र्याचे शेड उभारुन थाटलेल्या पत्त्याचा क्लबवर गुन्हे शाखा पोलीसांनी बुधवारी दुपारी चारच्या सुमारास छापा मारला. या छाप्यात पोलीसांनी १५ जुगाऱ्यांना  पकडले. तर जागा बळकावलेल्या व क्लब चालविणा-या सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरविणा-या महिलेसह तिच्या पुत्र व साथीदाराविरुध्द देखील क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

रविवार बाजारतळावरील अभिनय थिएटरच्या पाठीमागे जुगार अड्डा सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पत्र्याच्या शेडमध्ये सुरू असलेल्या या जुगार अड्ड्यावर पाठीमागील दरवाजातून पोलीसांनी प्रवेश केला. यावेळी छापा मारुन पोलीसांनी शेख अफसर शेख महेबुब (५०, रा. रेंगटीपुरा), वसीम पाशु बेग (३२, रा. संजयनगर), मोहम्मद अजहर मोहम्मद असद (३२, रा. आरेफ कॉलनी), अक्रम कुरेशी सलीम कुरेशी (३१, रा. सिल्लेखाना), शेख शफीक शेख अब्दुल रहीव (३२, रा. रेंगटीपुरा), सय्यद सईद सय्यद काशीम (४२, रा. मुजफ्फरनगर), असलम बेग अन्वर बेग (३१, रा. गणेश कॉलनी), फहाद निजामोद्दीन सिद्दीकी (२६, रा. सिटीचौक), असिफ कुरेशी रमजानी कुरेशी (२८, रा. नूतन कॉलनी), सोनाजी लक्ष्मण पवार (५५, रा. भवानीनगर), शाहरुख बागवान छोटू बागवान (२७, रा. बायजीपुरा), अथर खान जफर खान (३०, रा. बारी कॉलनी), सोहेल खान युनूस खान (२१, रा. नारेगाव), जहीर बशीर शेख (२७, रा. बायजीपुरा) आणि शेख अलीम शेख कासीम (३२, रा. रोजेबाग) यांना पकडले. त्यांच्याकडून रोख ८० हजार १२० रुपये तसेच जुगाराचे साहित्य व मोबाईल असा दोन लाख १९ हजार १२० रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
……
बळकावलेल्या जागेवर अड्डा…..
पोलिसांनी सांगितले कि, मोंढ्यातील व्यापारी विनय सुराणा यांच्या मालकीच्या जागेवर हा जुगार अड्डा सुरू होता. ही जागा सामाजिक कार्यकर्ता म्हणून मिरविणा-या महिलेने बळकावली असल्याचा आरोप आहे. त्या जागेवर मोठे पत्र्याचे शेड उभारुन या महिलेचा मुलगा जावेद सलीम पठाण व त्यांचा साथीदार अमजत कुरेशी (रा. संजयनगर, बायजीपुरा) हे अड्डा चालवित होते.
……..
गुन्हे शाखेची कारवाई……
व्यापारी विनय सुराणा यांनी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे अड्ड्यासह जागा बळकावल्याची तक्रार दिली. याप्रकरणाचा तपास उपनिरीक्षक अमोल देशमुख यांच्याकडे सोपविण्यात आला. त्यानंतर बुधवारी दुपारी पोलीस निरीक्षक मधुकर सावंत, सहायक पोलीस निरीक्षक अजबसिंग जारवाल, जमादार शिवाजी झिने, श्रीराम राठोड, राजेंद्र साळुंके, विकास माताडे, प्रभाकर राऊत, शिवाजी भोसले, संजय जाधव, संदीप क्षीरसागर, शेख सुलताना व अनिल थोरे यांनी छापा मारुन अड्ड्यावर कारवाई केली.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!