Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : बस प्रवासासाठी नकार दिल्याने अमानुष मारहाण , बायकोचा गर्भपात, नवरा, सासू फरार

Spread the love

औरंगाबाद – श्रीरामपुरला बहीणीचे मुलं सांभाळण्यासाठी बस ने जाण्यास नकार देणार्‍या विवाहितेचा नवरा व सासू ने लाथाबुक्क्या मारुन मंगळवारी सकाळी गर्भपात केला.या प्रकरणी क्रांतीचौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणातील आरोपी विक्रम राठोड(२८) धंदा मजुरी व त्याची आई शांता(५०) हे गुन्हा दाखल होताच फरार झाले.

छाया विक्रम राठोड(२०) रा. म्हाडा काॅलनी बाबा पेट्रोलपंपा समोर असे पिडीतेचे नाव आहे. छाया ही तीन महिन्यांची गर्भवती होती.दरम्यान विक्रम ची बहीण श्रीरामपुरला राहते.ती कामावर जात असल्यामुळे तिचे मुलं सांभाळण्यासाठी तू श्रीरामपुरला बसने एकटी जा.असे विक्रम ने सांगितले.परंतू छायाला बस लागते व ती गर्भवती आहे असे म्हणून तिने एकटे बसनी जाण्यास नकार दिला.या नकारामुळे विक्रम संतापला व आई शांता ला सोबत घेऊन छायाच्या पोटावर लाथाबुक्क्याने जबर मारहाण केली. या प्रकारानंतर छायाचे प्रचंड पोट दुखुलागल्यामुळे ती क्रांतीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास गेली. पोलिस निरीक्षक उत्तम मुळंक यांनी पिडीतेला घाटी रुग्णालयात उपचारासाठी नेले तेंव्हा तेथील स्री रोग तज्ज्ञांनी छायाचा गर्भ डॅमेज झाल्याचे सांगितले.पोलिसांनी छायाच्या आई वडलांना बोलावून घडलेली घटना सांगितली.व गर्भपाताची परवानगी घेऊन गर्भपात केला.या प्रकरणी छायाचा पती विक्रम आणि सासू शांता यांच्यावर जबरदस्ती गर्भपात घडवून आणल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक उत्तम मुळक यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय सोनटक्के करंत आहेत.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!