Aurangabad Crime : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या दोन घटना

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागात राहणार्‍या दोन अल्पवयीन मुलीवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणार्‍याविरूध्द संबंधीत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बायजीपुरा राहणार्‍या १६ वर्षीय अल्पयीन मुलीस हामेद खान हनिफ खान (वय २०, रा.बायजीपुरा) याने २० ऑक्टोबर रोजी मुंबईला पळवून नेले. हामेद खान याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून २० ते २७ ऑक्टोबर या काळात लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून हामेद खान याच्याविरूध्द जिन्सी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक पुनम पाटील करीत आहेत.
दुसर्‍या घटनेत, सिडको एन-४ परिसरातील स्पंदननगर येथे राहणार्‍या १६ वर्षीय अल्पवयीन मुलीस आकाश प्रकाश ठोकळ (वय १९, रा.चिकलठाणा) याने १४ ते १५ नोव्हेंबर या काळात लग्नाचे आमिष दाखवून पीडितेला शितपेयातुन गुंगीचे औषध देवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आकाश ठोकळ याच्याविरूध्द पुंडलिकनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास उपनिरीक्षक चव्हाण करीत आहेत.

Advertisements

आपलं सरकार