Nanded Crime : पोलिसांच्या चकमकीत नांदेड मधील कुख्यात गुंड शेरा उर्फ टायगर ठार

Advertisements
Advertisements
Spread the love

नांदेड जिल्ह्यातील कुख्यात गुंड शेरा उर्फ टायगर पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार मारला गेला. पोलिसांना अनेक गुन्ह्यात हवा असणारा शेरा  घटना घडलेल्या आखाड्यात लपून बसला असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचला आणि त्याला शरण येण्याचं आवाहन केले  मात्र त्याने उलट पोलिसांवर गोळीबार केला. दरम्यान पोलिसांनी उत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अखेर शेरा ठार झाला. बारड शिवारातील एका आखाडयावर हा थरार घडला. शेरा आणि त्याचा साथीदार अजय ढगे या दोघांनी रविवारी रात्री पिस्तुलचा धाक दाखवून  श्रीनगर येथील मेट्रो शूज दुकान लुटले होते. आरोपींनी दुकान मालकाला पिस्तुल दाखवून  धमकावले आणि दुकानातील रोख २२ हजार रुपये आणि काही सामान असा ३० हजाराचा ऐवज लुटून नेल्याचा गुन्हा त्यांच्यावर दाखल आहे.

Advertisements

दरम्यान आपण शेराचे माणसं असल्याचे देखील त्यांनी दुकान मालकाला सांगितले होते. रविवारी रात्री पासून पोलीस आरोपींच्या शोधात होते. अजय ढगेला पोलिसांनी अटक केली होती. तर शेरा सिंग उर्फ टायगर फरार होता. तो बारड शिवारातील आखाड्यावर लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलीस त्या ठिकाणी पोहचले. शेरा ला शरण येण्याचे पोलिसांनी सांगितले, पण त्याने पोलीस पथकाच्या दिशेने गोळीबार केला. पोलिसांनी देखील प्रत्युत्तर देत फायरिंग केले आणि त्यात  शेरा उर्फ टायगर ठार झाला.

Advertisements
Advertisements

अनेक दिवसांपासून पोलीस शेराच्या मागावर होते. मात्र प्रत्येक वेळी तो पोलिसांच्या तावडीतून निसटून जाण्यात यशस्वी होत असे. आज तो तावडीत सापडला आणि त्याचा निकाल लागला . शेराच्या नावावर अनेक गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

आपलं सरकार