Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र विधानसभा :”मी काय म्हातारा झालो ? अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे..” पक्ष सोडणारांवर पवारांकडून चौफेर टोलेबाजी !!

Spread the love

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्वादीतून  स्वकीयांनी पळ काढल्यानंतर स्वतः शरद पवारच पक्षाचा झेंडा हातात घेऊन महाराष्ट्र दौऱ्यावर निघाले आहेत.  आपल्या या दौऱ्यात त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांवर टीकेची झोड उठविली असल्याचे चित्र आज महाराष्ट्राला पाहावयास मिळाले . नाशिकच्या दौऱ्यावेळी शरद पवार यांनी विरोधकांना जोरदार फटकारे लागले आहेत. तर अमित शहा यांच्यावरही त्यांनी टीका केली आहे. मी अनेक बरी-वाईट कामं केली पण तुरुंगात कधी गेलो नाही असा टोला शरद पवार यांनी लगावला आहे.

शरद पवारांनी आजवर काय केलं अशी टीका गेल्या काही दिवसांत अमित शहा यांनी केली होती. यावर शरद पवार यांनी त्यांना उत्तर दिलं आहे. तुरुंगात गेलेल्यांनी मी काय केलं हे सांगू नये. मी आजवर अनेक बरं-वाईट कामं केली पण कधी तुरुंगात गेलो नाही असं शरद पवार म्हणाले आहेत. आपल्या भाषणात पवारांनी चौफेर टोले बाजी करताना म्हटले कि ,  माझ्या राजकारणाची सुरुवात सोलापूर जिल्ह्यापासून झाली.  १९६५  साली राज्यातील तरुणांचं नेतृत्त्व माझ्याकडं होतं. तेव्हा सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी माझाकडे होती.  सोलापूर जिल्हा यशवंतराव चव्हाणांच्या विचारावर चालणारा जिल्हा आहे.  स्वाभिमानी जिल्ह्यात लाचारी स्विकारणाऱ्या नेत्याला लोक जागा दाखवतात.  मोहिते पाटील, दिलीप सोपलांवर नाव न घेता टीका करताना ते म्हणाले कि ,  गेलेल्या लोकांचे नाव कशाला काढता ?  गेलेले नेत इतिहास जमा होणार आहेत.  गेलेल्याची चर्चा बंद करा येणाऱ्याची चर्चा करा.  भलत्याच्या दारात जाण्याची सुभेदारी ज्यांनी घेतली त्यांना जनता जागा दाखवेल.  विधानसभेनंतर महाराष्ट्राचे चित्र वेगळे असेल.  संयुक्त महाराष्ट्र चळवळीवेळी फक्त सोलापूर जिल्ह्यात कॉंग्रेस विजयी झाली होती.

यश कशासाठी? या विषयी बोलताना ते म्हणाले कि , सबंध राज्य आणि देशात वेगळे चित्र आहे.  सोलापूर जिल्हा कामगारांचा, शेतकऱ्यांचा जिल्हा होता.  शेतकरी आत्महत्या केल्यानंतर कुटुंबातील लोकांची अवस्था काय होत असेल ?  शरद पवारांनी सांगितला किल्लारी भुकंपाचा प्रसंग.  मुख्यमंत्री असताना सकाळी ७ वाजता किल्लारीत होतो.  आजचे राज्यकर्ते पुराचा दौरा हेलिकॉप्टरने करतात आणि अर्धा तासात गायब होतात.  राज्याच्या प्रमुखाने आपत्तीच्या ठिकाणी मुक्कामी करुन राहावं लागतं. कारण, त्याशिवाय यंत्रणा हालत नाही.

स्वतःच्या वयाबद्दल बोलताना ते म्हणाले कि , मी काय म्हातारा झालो ? अजून लय जणांना घरी पाठवायचं आहे.  ते कशाच्या जोरावर पाठवायचे? येथे उपस्थित तरुणाईच्या जोरावर पाठवायचं आहे.  मला काही लोकांच्याकडे बघायचं आहे. सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा मेळावा हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजित करण्यात आला होता. सोलापुरात आल्यानंतर शरद पवार यांनी चार हुतात्म्यांना अभिवाद करुन ते रॅलीत सहभागी झाले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी यावेळी मोठे शक्ती प्रदर्शन केलं. तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे आणि माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी मात्र पवारांच्या मेळाव्याला दांडी मारली आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!