Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : मोठी बातमी : मानवी तस्करी करून मध्यप्रदेशात विकलेल्या महिलेची केली जवाहरनगर पोलिसांनी सुटका !!

Spread the love

औरंगाबादच्या जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून हनुमान नगर येथून दोन महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दिनांक ८ जुलै २०१९  रोजी संबंधित महिलेच्या नातेवाईकांनी दिली होती.

बेपत्ता महिलेच्या आईने त्यांना मिळालेल्या माहितीनुसार त्यांची  मुलीला जबरदस्तीने मकला तालुका महिदपुर जिल्हा उज्जैन येथे डांबून ठेवले असल्याची माहिती मिळाली होती , हि माहिती त्यांनी जवाहरनगर पोलिसांना दिली . त्यानुसार जवाहर नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव यांनी  सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीमती श्रद्धा वायदंडे , पोलीस उपनिरीक्षक भरत पाचोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय बुटके,  पोलीस हवालदार संदीप जाधव,  महिला पोलीस कर्मचारी दिपाली झाडे यांचे विशेष पथक तयार करून त्यांना तत्काळ उज्जैन येथे मध्यप्रदेशात रवाना केले.

सदर पथकाने अत्यंत शिताफीने शिताफीने प्रतिकूल परिस्थितीत मध्यप्रदेशमधील अत्यंत दुर्गम भागात स्थानिक नागरिकांचा मोठ्या प्रमाणात विरोध असतानाही सदर भागात कायदा व सुव्यवस्थेचे सारखा प्रश्न निर्माण होत असताना परिस्थिती अत्यंत संयमाने हाताळून अतिसंवेदनशील भागातून सदर महिलेस मुक्त करून औरंगाबाद येथे परत आणण्यात यश मिळविले आहे.

सदर महिलेची तस्करी केल्यावरुन पोलीस ठाणे जवाहरनगर येथे गुन्हा दाखल करून आरोपी रंजनाबाई जोगदंड आणि  जिजाबाई शिंदे यांना अटक करण्यात आली आहे तसेच मध्य औरंगाबाद व मध्यप्रदेश येथील आरोपीनाही अटक करण्याची कार्यवाही करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले .

या प्रकरणात सदरची कार्यवाही आणि अधिक तपास  पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद , राहुल खाडे , उपायुक्त परिमंडळ 2,  साहाय्यक पोलिस आयुक्त उस्मानपुरा विभाग , निशिकांत भुजबळ,  जवाहरनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

दरम्यान या प्रकरणात पोलिसांकडून योग्य तपास होत नसल्याची तक्रार दिनांक १६ सप्टेंबर २०१९ रोजी , या प्रकरणातील फिर्यादी महिलेने पोलीस आयुक्तांकडे केली होती. याशिवाय त्यांनी  या प्रकरणात औरंगाबाद खंडपीठात हेबियस कॉरपर्स क्रमांक डब्ल्यू 14 25 / 2019  अन्वये दाखल केलेली असून  त्यांच्या वकील रश्मी कुलकर्णी काम या याचिकेचे काम पाहत आहेत.

सदर  निवेदनात फिर्यादी महिलेने म्हटले होते की त्यांची मुलगी आणि पुतणी या बेपत्ता असल्याची माहिती त्यांनी जवाहरनगर पोलिसांना दिली होती . सदर महिले पैकी तिच्या बेपत्ता मुलीला  जवाहर नगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या एका महिलेने त्यांच्या मुलीला नोकरीला लावतो म्हणून औरंगाबादला बोलावून घेतले होते. त्यानुसार ती जालना येथून औरंगाबादला आली होती . त्यानंतर तक्रारदार महिलेने आपल्या मुलीचा ठाव ठिकाण घेण्याचा प्रयत्न केला परंतु तिचा शोध लागत नव्हतं . शेवटी अधिक चौकशी करता त्यांना माहिती मिळाली कि , ज्या महिलेने त्यांच्या मुलीला औरंगाबादला  कमला लावण्याचे आमिष दाखवून बोलावले होते ती महिला आणि तिचे साथीदार मुलींना पाठविण्याचे काम करतात . त्यानंतर तक्रारदार महिलेने बेपत्ता मुलीविषयी बरीच माहिती पोलिसांना दिली परंतु तपासात काय होतेय ? हे त्यांना सांगितले जात नव्हते .

दरम्यान जवाहर नगर पोलिसांनी माहितीची खातरजमा करून परराज्यात जाऊन याप्रकरणी पोलिसांनी तपास करून मोठ्या शिताफीने यापैकी एका बेपत्ता महिलेला ताब्यात घेऊन औरंगाबादला आणण्यास यश मिळवले आहे. तर संशयित आरोपींना अटक करण्यात येत आहे.

फिर्यादी महिला राजेगाव तालुका घनसावंगी जिल्हा जालना येथील रहिवासी असून त्यांना तीन मुले व दोन मुली आहेत . त्यापैकी बेपत्ता मुलीचा विवाह औरंगाबाद येथील तरुणाशी लावून दिला होता परंतु कौटुंबिक वादामुळे त्यांनी जावई व तिच्या सासरच्या लोकांविरुद्ध न्यायालयात कौटुंबिक न्यायालय खटला दाखल केला आहे.  हि मुलगी औरंगाबाद येथे असताना तिची रंजनाबाई जोगदंड,  राहणार इंदिरानगर या महिलेशी ओळख झाली होती. याच  महिलेने मी तुला नोकरीला लावून देते म्हणून बेपत्ता महिलेला औरंगाबाद येथे बोलावले होते .  तक्रारदार महिलेने दिलेल्या माहितीनुसार आरोपींनी  त्यांच्या मुलीला मध्य प्रदेशात उज्जैन येथे औरंगाबादेतील  संशयित आरोपी इसमाने ऐंशी हजार रुपयांमध्ये, बेपत्ता मुलीचा तोतया  मामा बनून तिचा विवाह मध्यप्रदेशातील इसमाशी लावून दिला होता.  ही सर्व माहिती आणि पत्ता तक्रारदार महिलेने जवाहर नगर पोलिसांना दिला होता त्यावरून या प्रकरणात पोलिसांनी तपास करून बेपत्ता झालेल्या महिलेला औरंगाबादला परत आणण्यास आणण्यात यश मिळाले आहे.  दरम्यान दुसरी बेपत्ता महिलाही मध्यप्रदेशातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून तिचाही शोध घेतला जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!