Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad : विवाहितेचा संशयास्पद मृत्यू, नवऱ्यासह तिघांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल

Spread the love

या प्रकरणात नवरा कय्युमखान बशीरखान, दीर फिरोजखान बशीरखान, नणंद तब्बसुमबशीरखान यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल झाला असून तिन्ही आरोपी फरार झाले आहेत. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल आडे करीत आहेत.


औरंंंगाबाद : दोन वर्षापूर्वी विवाह झालेल्या २० वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाला. ही घटना १८ जुलै रोजी सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास सातारा परिसरातील उर्जानगर भागात घडली होती . दरम्यान, विवाहितेचा खून करून ती आत्महत्या भासविण्याचा प्रयत्न पतीसह सासरकडील मंडळी करीत असल्याचा आरोप करीत माहेरच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले.या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद सातारा पोलिसांनी घेतली.पण रात्री उशीरा पर्यंत मयताच्या नातेवाईकांनी खुनाचा गुन्हा सासरच्या मंडळींवर दाखल करण्याची भूमीका घेतली होती त्यानंतर आता या प्रकरणात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समरीन फातेमा कय्यूम खान (वय २०, रा.प्लॉट नंबर ७, उर्जानगर, बीडबायपास) हिचा विवाह दोन वर्षापुर्वी इंजिनियर असलेल्या कय्यूम खान बशीर खान याच्यासोबत झाला होता. लग्नाचे काही दिवस व्यवस्थीत नांदविल्यानंतर पतीसह सासरकडील मंडळी समरीन फातेमा हिचा घरगुती कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करीत होते. गुरूवारी सकाळी सव्वानऊ वाजता समरीन फातेमा हिने आपल्या खोलीतील छताच्या पंख्याला ओढणीने बांधून  गळफास घेतला. हा प्रकार तिच्या पतीच्या लक्षात आल्यावर त्याने समरीन फातेमा हिला फासावरून खाली उतरवून बेशुध्दावस्थेत उपचारासाठी सकाळी पावणेबारा वाजेच्या सुमारास घाटीत दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

या प्रकरणी सातारा पोलिसानी प्रथम दर्शनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती . दरम्यान, समरीन फातेमा हिने सकाळी सव्वानऊ वाजेच्या सुमारास गळफास घेतला असल्याचे आढळून  आल्यावर सासरकडील मंडळीने दुपारी पावणेबारा वाजता घाटीत का दाखल केले, दोन ते अडीच तास समरीन फातेमा कोठे होती याचा तपास करून सासरच्या पतीसह सासरच्या मंडळीवर खूनाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करीत माहेरच्या नातेवाईकांनी सातारा पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले होते . पोलिस निरीक्षक अनिल आडे यांनी संतप्त नातेवाईकांची समजूत कडून  आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्यावर नातेवाईकांनी आपले आंदोलन मागे घेतले आणि आज या प्रकरणात नवरा कय्युमखान बशीरखान, दीर फिरोजखान बशीरखान, नणंद तब्बसुमबशीरखान यांच्या विरुध्द खुनाचा गुन्हा दाखल केला.

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!