वाईन शॉपी व्यवस्थापकाचा खून , चार लाखाचा ऐवज घेऊन हल्लेखोर पसार, सिल्लोड शहरातील थरार …

Advertisements
Advertisements
Spread the love

दारूचे दुकान (वाईन शॉपी) बंद करून मोटारसायकलवर घरी निघालेल्या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या दोघांनी प्राणघातक हल्ला करून चार लाख रुपये पळविण्याची घटना औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड शहरात रविवारी रात्री साडे अकरा वाजता घडली.

Advertisements

हल्लेखोरांनी केलेल्या चाकू हल्ल्यात एक जण मरण पावला, तर दुसरा गंभीर जखमी झाला. रविवारी रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास वाईन शॉपीचा व्यवस्थापक भिकन जाधव व त्यांचा सहकारी नेहमीप्रमाणे आपले वाईन शॉप बंद करून शहरातील सिल्लोड-भराडी रस्त्यावरून जयभवानीनगरकडे जात असताना दोन अनोळखी हल्लेखोर दुचाकीवरून आले व त्यांनी या दोघांना चाकूने भोसकून त्यांच्याजवळील चार लाख रुपये घेऊन पळ काढला.

Advertisements
Advertisements

दरम्यान, चाकूने भोसकल्याने भिकन निळूबा जाधव (५०, रा. जयभवानीनगर, सिल्लोड हे जागीच जगप्राण झाले तर त्यांचा सहकारी लक्ष्मण पुंजाजी मोरे (४५, रा. मोढा) हे गंभीर जखमी झाले. त्यांना सिल्लोड उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून तातडीने औरंगाबादला हलविण्यात आले आहे. घटनेचे माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, रात्री उशिरापर्यंत हल्लेखोरांचा शोध सुरू होता. भर शहरात ही थरारक घटना घडल्याने नागरिकांत भितीचे वातावरण निर्माण झाले आहे

आपलं सरकार