बलात्कार करून तिचा खून करणारा अटकेत

Spread the love

५ वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून तिचा खून करणाऱ्या नराधमाला अटक करण्यात आली आहे. या पाच वर्षांच्या मुलीवर ८ फेब्रुवारीला बलात्कार करण्यात आला होता, त्यानंतर तिची हत्या करण्यात आली. मेहंदी हसन मोहम्मद असं या नराधमाचं नाव आहे. माहिममधून त्याला अटक करण्यात आली आहे.
बलात्कार झालेल्या मुलीचा मृतदेह पोलिसांना एका निर्जन ठिकाणी मिळाला. ही मुलगी घरातून बेपत्ता झाली होती. तिच्या पालकांनी ती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी या मुलीचा शोध सुरु केला होता. या मुलीचा मृतदेह एका निर्जन ठिकाणी आढळला. त्यानंतर पोलिसांनी हा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. त्यानंतर या मुलीवर बलात्कार झाल्याची माहिती समोर आली. यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका नराधमाला अटक केली आहे. POCSO अंतर्गत त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. या नराधमाची चौकशी करण्यात येते आहे.