Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

“जरांगे फॅक्टर” वर बोलले जरांगे पाटील, ’हेही सरकार मराठ्यांच्या जीवावर..आमच्याशी बेईमानी कराल तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार… !!

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : विधानसभा निवडणुकांमध्ये जरांगे फॅक्टर किती असेल हा सगळ्यांच्याच कुतुहलाचा विषय झालेला असताना विधानसभेच्या निकालानंतर मनाेज जरांगेंनी माध्यमांशी संवाद साधला. निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणा-यांना त्यांनी उत्तर देत आम्ही मैदानातच नाहीत आणि तुम्ही आम्हाला फेल म्हणताय? असा सवाल करत नव्या सरकारचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. हे सरकारसुद्धा मराठ्यांच्या ताकदीवर आल्याचं सांगत मराठा आरक्षणाचं तातडीनं नाव घेतलं नाही तर मराठे पुन्हा छाताडावर बसणार असा इशारा नव्या सरकारला मनाेज जरांगेंनी दिला..

मराठा आरक्षण, लाडकी बहीण, नात्यागाेत्यांच्या लढती, मनाेज जरांगेंशी घेतलेल्या भेटीगाठी,काेट्यवधींची देवाणघेवाण, हमीभावावरून शेतक-यांची नाराजी आणि आश्वासनांची खैरात या मुद्द्यांवर गाजलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत मराठवाड्याच्या 46 जागांवर जरांगेंचा फॅक्टर किती चालला असा प्रश्न वारंवार विचारला जात असताना मनाेज जरांगेंनी यावर उत्तर दिलंय.

Advertisements

जरांगे फॅक्टर फेल कसा झाला? मनाेज जरांगेंचा सवाल

विधानसभेत मनाेज जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणणा-यांना मनाेज जरांगे यांनी उत्तर दिलं आहे. काेणत्या घटकानं श्रेय घ्यावं हा त्यांचा प्रश्न आहे. आम्ही मैदानातच नाही आणि तुम्ही म्हणता जरांगे फॅक्टर फेल झाला म्हणता. आम्ही मैदानात नाही. काेण निवडणून आलं काेण पडलं याचं आम्हाला साेयरसुतक नाही. जेवढे निवडून आलेत ते सगळे मराठा फॅक्टरमुळंच आले असल्याचं मनाेज जरांगे म्हणाले. निवडून आलेल्या आमदाराला म्हणायला सांगा मराठ्यांच्या मतावर निवडून आलाे नाही, हे सगळं कळायला तुमची हयात जाईल. तिथं बसून गप्पा ठाेकू नका.

Advertisements
Advertisements

मराठ्यांशी बेईमानी कराल तर…

यांना दुस-यांचे पाळणे लाेटायची सवय आहे. मराठ्यांना काेणाचं साेयर सुतक नाही. मराठे उभे आहेत कुणीही आलं तरी..सरकारलाही सांगताे, निवडून यावं न यावं याच्याशी आम्हाला काही नाही. मराठ्यांशी बेईमानी कराल तर मराठ्यांना काेणाचंच सरकार राेखू शकत नाही. गावातल्या रडक्या पाेरांसारखं झालंय हे. घरात नसलं की ते जसं रडतं तसं आम्ही मैदानातच नव्हताे. असं म्हणत जरांगेंनी नव्या सरकारला खडसावलं.

…मग दाखवलं असतं,सरकारला मनापासून शुभेच्छा !!

हे सुद्धा सरकार मराठ्यांच्या ताकदीवर आले आहे.आम्ही मैदानात पाहिजे हाेताे मग दाखवले असते.मी आणि माझा मराठा समाज मैदानात नव्हता.सरकारला मनापासून अभिनंदन शुभेच्छा. काेणी माजात मस्तीत यायचे नाही, तुम्ही सरकार आहेत.सत्तेत आलेत तर दादागिरी गुंडगिरी ची भाषा करायची नाही.मराठा मी बंधन मुक्त केला हाेता. देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले मराठा समाज साेबत हाेता,मराठ्या शिवाय पान हालत नसते.काेणाचेही सरकार आले तर आम्हाला आंदाेलन करावा लागणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!