MaharashtraPolitical : महायुती सरकारचा उद्या शपथविधी, मंत्रीपदाचा फॉर्म्युलाही ठरला !!
मुंबई : महायुतीच्या मंत्रिपदाचा शपथविधी साेमवारी हाेण्याची शक्यता आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, उद्या राजभवनात किंवा वानखेडे स्टेडिअमवर मुख्यमंत्री आणि दाेन उपमुख्यमंत्र्यांचा शपथ साेहळा संपन्न हाेईल. राजभवनाला शपथविधी हाेण्याची दाट शक्यता आहे. 1990 नंतर विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक जागा जिंकणारा भाजप हा पहिला पक्ष ठरला आहे. यानंतर आता राज्य निवडणूक आयाेगाचे अधिकारी रविवारी संध्याकाळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेणार आहेत.
महायुती सरकारच्या सत्तास्थापनेपूर्वी काेणाला किती मंत्रीपदं मिळणार, याची चर्चा सुरु झाली आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता मुख्यमंत्रिपदापासून मंत्रिमंडळाच्या फॉर्म्युल्यावर देखील महायुतीमध्ये चर्चा सुरु झाली आहे. महायुतीमध्ये मंत्रिमंडळाचा अंदाजित फॉर्म्युला 21, 12, 10 असा असू शकताे. यात भाजपला सर्वाधिक 21 मंत्रिपदे, त्यानंतर शिवसेनेला 12 आणि राष्ट्रवादीला 10 मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. ही प्राथमिक चर्चा असून यामध्ये प्राथमिक केलेली वाटाघाटी असल्याचं सांगण्यात येत आहे.
काेणत्या पक्षाचा किती जागांवर विजय झाला?
महायुती- 236
मविआ- 49
इतर- 3
———————
भाजपा- 132
शिवसेना (शिंदे गट)- 57
राष्ट्रवादी (अजित पवार गट)- 41
काँग्रेस- 16
राष्ट्रवादी (शरद पवार गट)- 10
शिवसेना (ठाकरे गट)- 20
समाजवादी पार्टी- 2
जन सुराज्य शक्ती- 2
राष्ट्रीय युवा स्वाभीमान पार्टी- 1
राष्ट्रीय समाज पक्ष- रासप- 1
एमआयएम- 1 जागा
सीपीआय (एम)- 1
पिजन्ट्स अँड वर्कर्स पार्टी ऑ\ इँडिया- पीडब्ल्यूपीआय- 1
राजर्षी शाहू विकास आघाडी- 1
अपक्ष- 2