Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraAssemblyUpdate : विनायक मेटे यांच्या अपघाताविषयी विधानसभेत चर्चा …

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई  : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या मृत्यूच्या  संदर्भात आ. वर्षा गायकवाड  यांनी प्रश्न उपस्थित करून  सरकार अशा अपघातांवर काही उपाययोजना करणार  काय ? असा सवाल उपस्थित केला. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, चालकाचा अंदाज चुकल्याने विनायक मेटे यांचा अपघात झाला. या अपघातात मेटे यांचा जागीच मृत्यू झाल्याची डॉक्टरांची माहिती दिली. यंत्रणा बदलणं गरजेचं आहे. अपघाताचं लोकेशन न कळल्यानं मदत पोहोचायला उशीर झाला, असं उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी निवेदन मांडताना म्हटलं आहे.


महामार्गावरील अपघाताचा मुद्दा उपस्थित करताना वर्षा गायकवाड यांनी म्हटलं की, शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या अपघातानंतर मुंबई-पुणे महामार्गावर झालेला अपघाताची सरकारने चौकशी लावली आहे. मात्र इतर महामार्गावरही अपघात होत आहेत. अनेक अपघात हे खड्यांमुळे होत आहे. कोकणातील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे आहेत. माझा डोळ्यासमोर त्या दिवशी खड्यांमुळे अपघात झाला. याबाबत शासन काय धोरणात्मक निर्णय घेणार आहे, असा सवालही वर्षा गायकवाड यांनी उपस्थित केला.

Advertisements

फडणवीस यांचे उत्तर…

दरम्यान या मुद्द्यावर करताना  उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, ‘मेटे यांच्या अपघाती निधनाबाबत अनेक गोष्टी कार्यकर्ते आणि त्याच्या पत्नींनी माझाजवळ उपस्थित केल्या आहेत. मेटे यांचा चालक ओव्हरटेक करताना  हा अपघात झाला. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करताना ही घटना घडली. याबाबत विस्तृत माहिती समोर आल्यावरच बोलता येईल. मात्र गंभीर बाब म्हणजे मेटेंच्या चालकाने फोन केल्यानंतरही वेळेत मदत पोहचली नाही, असं म्हटलं गेलं आहे. मात्र चालकाने सांगितल्याप्रमाणे नवी मुंबई आणि रायगड पोलीस त्यांच्या रस्त्यात शोध घेत होते. पण अपघाताची लोकेशन कळू शकत नव्हती. त्यामुळे यंत्रणा बदलणं गरजेचं आहे.’

Advertisements
Advertisements

ट्रेलरवर कारवाई करणार…

ही यंत्रणा चुकीची असून यंत्रणा बदलणं गरजेचं असल्याचं फडणवीस यांनी म्हटलं. अपघात झाल्यानंतर थेट लोकेशन मिळणे सोपे होईल अशी यंत्रणा उभी करण्यावर आम्ही भर देणार असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं आहे. तसेच लेन सोडून चालणाऱ्या ट्रेलरवर कारवाई करणार, लेन सोडून जाणाऱ्या ट्रेलरची माहिती मिळाल्यास थेट कारवाई करता येईल, अशी यंत्रणा उभी करणं गरजेचं असून त्यावर आम्ही अत्याधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणार आहोत, असंही फडणवीस यांनी सांगितलंय.

रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला…

देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, आपण रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे. मी सभागृहात सांगतो की हा प्रवास टाळला पाहिजे. मीही रात्री प्रवास करतो. त्यामुळे आपण सर्वांनी रात्रीचा प्रवास टाळला पाहिजे कारण अपघात होण्याची शक्यता असते. विनायक मेटे यांच्या पत्नी म्हणाल्या की मी त्यांना रात्री प्रवास करु नका असं सांगितलं होतं, मात्र त्यांनी ऐकलं नाही.’ याआधी विरोधी पक्षनेते अजित पवार, केंद्रीय गृहमंत्री नितीन गडकरी यांनीही रात्रीचा प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे.

सीआयडी तपस करीत आहेत…

फडणवीस यांनी म्हटलं आहे की, ड्रायव्हरचा जबाब बदलत आहे. घातपात आहे की नाही याची शंका उपस्थित होऊ नये म्हणून सीआयडी या प्रकरणाचा तपास करेल. या प्रकरणात शासकीय मदत मिळण्यास काही चूक  झाली आहे का ? याचाही स्वतंत्र तपास केला जाईल. चौथी लेन सुरू करण्याबाबत मी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करीन, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे. सरकाऱ्यांबाबत सकारात्मक पाऊले उचलेल.’

विनायक मेटे यांच्या पत्नीचा अजित पवार यांना फोन

यावर निवेदन देताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी म्हटलं आहे की, विनायक मेटे यांच्या पत्नीचा हा मला फोन आला होता. दुसऱ्या कोणावरही  अशी वेळ येऊ नये यासाठी अंमलबजावणी केली पाहिजे. सध्याची मुंबई-पुणे एक्सप्रेसवर सर्वात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. सध्या सहा लेन आहेत, त्या आठ लेन करण्यात याव्यात म्हणजे अवजड वाहतुकीला जागा मिळेल. अनेक ठिकाणी कॅमेरे बसवले आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर दंड बसत आहेत. अनेक आमदारांनाही  लाखो रुपयांचा दंड बसला आहे. महिन्याभरात जे कमवलं तेवढं यात गमवावा लागतं, असं आमदारांचं म्हणणं असल्याचंही पवार म्हणाले.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!