Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MumabiNewsUpdate : व्हीबीएचे नेते प्रकाश आंबेडकर यांची यशवंत सिन्हा यांना विनंती …

Advertisements
Advertisements
Spread the love

 मुंबई : उद्या १८ जुलै रोजी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीतून विरोधी पक्षांच्या संयुक्त आघाडीचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती बहूजन विकास आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. यशवंत सिंन्हा यांच्या विरोधात भाजपाकडून द्रौपदी मुर्मू यांना राष्ट्रपती पदाची उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान बहुजन समाज पक्षाच्या नेत्या मायावती यांनीही द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. 

खरे तर या निवडणुकीत भाजप , एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांची निवड निश्चित असली तरी विरोधी पक्षाकडून युपीएचे उमेदवार म्हणून यशवंत सिन्हा यांना उमेदवारी देण्यात अली असून त्यांनी देशभर विविध राज्यात फिरून विरोधी पक्षांनी आपल्याला मतदान करण्याचे आवाहन केले आहे. त्यांना आप आणि राजदनेही आपला पाठिंबा जाहीर केला आहे. महाराष्ट्रात मात्र आदिवासी समाजाच्या उमेदवार म्हणून पक्षातील खासदारांच्या विनंतीला मान देऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही द्रौपदी मुर्मू यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.

Advertisements

दरम्यान या प्रकरणात वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनीही एका ट्विटद्वारे , यशवंत सिन्हा यांनी आपली राष्ट्रपती पदाची उमेदवारी मागे घ्यावी, अशी मी त्यांना विनंती करतो. देशातील सर्वच पक्षांतील अनुसूचित जाती, आदिवासी आणि दलित सदस्य द्रौपदी मुर्मू यांना पाठिंबा देत आहेत. त्यामुळे यशवंत सिन्हा यांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

Advertisements
Advertisements

द्रौपदी मुर्मूबद्दल आदर पण पाठिंबा यशवंत सिन्हा यांना : आप

दरम्यान आम आदमी पार्टी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षाचे सामान्य उमेदवार यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देणार आहे. आम आदमी पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी ही घोषणा केली आणि ‘आम्हाला द्रौपदी मुर्मूबद्दल आदर आहे. मात्र आम्ही यशवंत सिन्हा यांना पाठिंबा देऊ. आम आदमी पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!