Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaNewsUpdate : आरएसएसप्रणित भारतीय मजदूर संघाकडून नीती आयोगाच्या धोरणावर टीका …

Spread the love

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या भारतीय मजदूर संघाने  शनिवारी नीती आयोगाच्या “जनविरोधी धोरणांबद्दल” टीका केली. १३ ते १७ जुलै दरम्यान बीएमएसची कार्यशाळा सुरू असून यामध्ये संघटनेच्या ३२ युनिटचे १२० पदाधिकारी सहभागी होत आहेत. बीएमएसचे सरचिटणीस विनय कुमार सिन्हा यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, कोल इंडिया लिमिटेडचे ​​कर्मचारी आणि व्यवस्थापन यांच्यात वेतन पुनरावलोकनाची वाटाघाटी झाली होती, परंतु लिमिटेडने कर्मचार्‍यांना केवळ तीन टक्के वाढ देऊ करून नकारात्मक भूमिका घेतली.

“कर्मचाऱ्यांनी किमान हमी लाभात ५० टक्के वाढ करण्याची मागणी केली आहे. आम्हाला सन्माननीय तोडगा हवा आहे. या ज्वलंत प्रश्नावर कार्यशाळेत चर्चा झाली. केंद्र सरकारने लवकरात लवकर कामगार संहिता लागू करावी अशी आमची इच्छा आहे. सिन्हा म्हणाले की, मोबदला आणि सुरक्षा संहिता ऐतिहासिक आहे आणि कर्मचारी आणि नियोक्ते यांच्यासाठी अनेक फायदे आहेत, परंतु औद्योगिक संबंध संहिता, व्यावसायिक सुरक्षा, आरोग्य आणि कामकाजाच्या परिस्थिती संहितेच्या काही तरतुदी कर्मचाऱ्यांच्या हिताच्या नाहीत. “पूर्वी नियोजन आयोग सूचना देत असे. पण आता त्याच्या जागी आलेला नीती आयोग बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींनी भरलेला आहे आणि ते लोक किंवा समाजाभिमुख नसलेल्या सूचना देत आहेत. दुर्दैवाने त्यांच्या सूचनांवर सरकार पुढे जात आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!